‘माझ्यासोबत लग्न करून द्या, अन्यथा सर्वांना संपवितो’ घरात घुसून धमकी

Crime News
Crime NewsCrime News

अमरावती : मुलींना धमक्या देणे, त्यांची छेडखानी करून मन:स्ताप देण्याच्या घटना सतत वाढत आहे. माहुली जहाँगीर ठाण्याच्या हद्दीत एका युवतीच्या घरात शिरून युवकाने माझ्यासोबत लग्न करून द्या, अन्यथा सर्वांना संपवितो, अशी धमकी दिली. वैभव सुरेशराव गाढवे (वय २८) असे संशयित युवकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, युवती आईवडील व कुटुंबातील इतर सदस्यांसोबत शुक्रवारी रात्री घरी जेवण करीत होती. नेमके त्याचवेळी संशयित वैभवने युवतीच्या घरात शिरून हात पकडला. माझ्यासोबत हिचे लग्न लावून द्या, अन्यथा सर्वांना मारून, स्वत:च्याही जिवाचे बरेवाईट करण्याची थेट धमकी दिली. आपल्या बहिणीची घरात घुसून छेडखानी होत असल्याचे बघून भावाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यालाही संशयित आरोपीने धक्काबुक्की केली.

Crime News
गृहमंत्री म्हणाले, रश्मी शुक्ला यांनी महत्त्वाच्या नंत्यांचे फोन टॅप केले

यापूर्वीही त्याने युवती रस्त्याने जात असताना अडवून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातील काही दिवस युवतीने त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, संशयित आरोपीला ताकीद देऊनही काहीच सुधारणा होत नसल्याचे बघून मुलीने माहुली जहाँगीर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी संशयित वैभव विरुद्ध घरात घुसून, विनयभंग, ठार मारण्याची धमकी (Threat) दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com