उपराजधानीत मुली असुरक्षित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

नागपूर: वारंवार उघडकीस येणाऱ्या घटनांवरून वयात येणाऱ्या मुली असुरक्षित असल्याचे लक्षात येते. जरीपटका हद्दीत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले. सततच्या अत्याचारामुळे ती गर्भवती राहिली असता बळजबरीने गर्भपात करवून घेण्यात आला. याशिवाय एमआयडीसी, नंदनवन आणि पाचपावली हद्दीतून तीन अल्पवयीन मुलींना पळवून नेण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

जरीपटका हद्दीत राहणारा 19 वर्षीय आरोपी शुभम सेन याने वस्तीतच राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर प्रेमाचे जाळे फेकले. केवळ गंमत म्हणून त्यांच्यात एक दिवस शरीरसंबंध झाला. त्यानंतर आरोपी लग्नाचे आमिष दाखवून तिचे सतत लैंगिक शोषण करीत राहिला. ती गर्भवती राहिली असता बळजबरीने गर्भपातही करवून घेतला. अलीकडे मात्र तो पीडितेला टाळू लागला. ही बाब लक्षात येताच पीडितेने जरीपटका ठाणे गाठून तक्रार दिली.
एमआयडीसी हद्दीत राहणारी 16 वर्षीय मुलगी 7 जुलैला घराजवळील दुकानात साहित्य घेण्यासाठी गेली. त्यानंतर परतच आली नाही. नंदनवन हद्दीत राहणारी 14 वर्षीय मुलगी 12 जुलै रोजी सकाळी घरी कुणालाही काहीही न सांगता निघून गेली. तसेच पाचपावलीत राहणारी अल्पवयीन मुलगी 12 जुलैलाच दुपारी गणवेश घालून शाळेत गेली. त्यानंतर परत आली नाही. या तिन्ही मुलींना फूस लावून पळवून नेण्यात आल्याचे पुढे येत आहे. पालकांच्या तक्रारीवरून संबंधित पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girls in Nagpur are insecure