नागपूर : एक महिन्याचा बालिकेचा गळा आवळून खून 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

एक महिन्याच्या चिमुकलीचा गळा आवळून खून करण्यात आला आहे.

कामठी (नागपूर) : एक महिन्याच्या चिमुकलीचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. हे कौर्य येथेच थांबले नाही तर चिमुकलीचा मृतदेह गोठ्यातील चिखलात गायी म्हशीच्या पायाखाली तुडविण्यासाठी फेकून दिला. ही हृदयविदारक घटना बुधवारी मध्यरात्री 2 दरम्यान घडली असून, या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचे मुख्य कारण अजूनही गुलदस्त्यात असून पोलिसांनी मृत छकुलीच्या आई व आजीला संशयितरित्या ताब्यात घेतले आहे .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl's throat murdered