सुधरण्याची संधी प्रत्येकाला द्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

नागपूर : हातून कळत-नकळत झालेल्या चुकांची शिक्षा अनेक बंदी मध्यवर्ती कारागृहात भोगत आहेत. त्या चुकांचा त्यांना निश्‍चितच पश्‍चात्तापसुद्धा होत असेल. त्यामुळे प्रत्येकाला सुधरण्याची एक तरी संधी दिली पाहिजे, असे आवाहन शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेचे अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त नीलेश भरणे यांनी केले.

शनिवारी मध्यवर्ती कारागृहात महिला कैद्यांनी तयार केलेल्या राख्यांची विक्री आणि प्रदर्शनाचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते. या वेळी कारागृहाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई, कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे उपस्थित होते. "सुधारणा व पुनर्वसन' हे कारागृह प्रशासनाचे ब्रीदवाक्‍य आहे. त्याच अनुषंगाने प्रत्येक कैद्यात असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच कारागृहाबाहेर येताच रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी कारागृह प्रशासन वेगवेगळे उपक्रम राबवीत असते. दर वर्षीप्रमाणे यंदाही कारागृह प्रशासनाने महिला कैद्यांनी बनविलेल्या राख्यांची विक्री व प्रदर्शन भरविले. हे प्रदर्शन 10 ते 16 ऑगस्टपर्यंत सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत नागरिकांसाठी सुरू आहे. बाजारदरापेक्षा अगदी स्वस्त दरात कारागृहात राख्या उपलब्ध आहेत. याशिवाय वीणकाम, लाकडी, लोखंडी, बेकरी, कापडी कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रशिक्षण देण्यात येते. तंत्रशुद्ध प्रशिक्षण प्राप्त कैद्यांकडून वस्तू बनवून घेतले जातात. हे प्रदर्शन सामान्य नागरिकांसाठी खुले ठेवले असून, नागपूरकरांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन कारागृह प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give everyone the opportunity to improve