पाहुण्यांना ‘कोल्ड्रिंक’ऐवजी दूध द्या - गडकरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

नागपूर - वाढदिवस किंवा घरातील इतर समारंभात पाहुण्यांना ‘कोल्ड्रिंक’ऐवजी दूध द्या. यामुळे पाहुण्यांचे आरोग्य चांगले राहीलच, शिवाय शेतकऱ्यांचा लाभ होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नागपूर - वाढदिवस किंवा घरातील इतर समारंभात पाहुण्यांना ‘कोल्ड्रिंक’ऐवजी दूध द्या. यामुळे पाहुण्यांचे आरोग्य चांगले राहीलच, शिवाय शेतकऱ्यांचा लाभ होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या ‘गिफ्ट मिल्क’ या विद्यार्थ्यांसाठीच्या उपक्रमाचा प्रारंभ शनिवारी हनुमाननगर येथील महानगरपालिकेच्या लालबहादूर शास्त्री माध्यमिक शाळेत गडकरींच्या हस्ते झाला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, आमदार नागो गाणार, मनपा सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विभागीय आयुक्त अनुपकुमार, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे अध्यक्ष दिलीप रथ, विदर्भ मराठवाडा दुग्ध व्यवसाय विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक रवींद्र ठाकरे उपस्थित होते.

महाजेनकोच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळांमध्ये हे सुगंधी दूध देण्याची घोषणा पालकमंत्री बावनकुळे यांनी केली. जिल्ह्यातील २१ शाळांमधील सहा हजार विद्यार्थ्यांना रोज २०० मिलीलिटर दूध प्रतिविद्यार्थी देण्यात येणार आहे. मदर डेअरीच्या सीएसआर फंडातून हा उपक्रम चालविण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी संचालक वाय. वाय. पाटील यांनी दिली.

दूध सुगंधी, चविष्ट
देशात ३६ टक्के मूल कुपोषित आहेत. दुधामुळे कुपोषण कमी होण्यास मदत होईल. दुधाच्या वापरामुळे उत्पादनालाही चालना मिळून शेतकऱ्यांना फायदा होईल. परिणामी त्यांच्या आत्महत्या थांबण्यास मदत होईल. हे दूध सुगंधी व चविष्ट आहे. विद्यार्थी हे दूध पिण्यासाठी शाळेत नक्की येतील. लोकांनी विशेषत: नगरसेवकांनी विविध समारंभात पाहुण्यांना कोल्ड ड्रिंक देण्याऐवजी हे दूध दिले, तर सर्वांचा फायदा होईल, असे नितीन गडकरी म्हणाले.

Web Title: Give the guests milk instead of the colddrinks says nitin gadkari