उत्तम गॅल्वात स्थानिकांना रोजगार द्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

वर्धा : शहरालगतच्या भूगाव येथील उत्तम स्टील व्हॅल्यू कंपनीत परप्रांतीयांचा भरणा अधिक असल्याने स्थानिकांवर अन्याय होत आहे. स्थानिकांना रोजगार देण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते ऍड. उज्ज्वल काशीकर यांच्या नेतृत्वात साकार ग्रुपच्या सुशिक्षित बेरोजगारांनी बुधवारी (ता. 11) कंपनी परिसरात धडक देत मागण्यांचे निवेदन सादर केले. कंपनीच्या महाव्यवस्थापकांनी निवेदन स्वीकारत 15 दिवसांत कार्यवाही करण्याचे शिष्टमंडळाला आश्‍वासन दिले.

भूगाव येथे अनेक वर्षांपासून उत्तम स्टील व्हॅल्यू कंपनी आहे. या कंपनीने शासन निर्णय बासनात गुंडाळून परप्रांतीयांचाच अधिक भरणा केला आहे. परिणामी, स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम नसल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहे. हे युवक नोकरीच्या शोधार्थ इतरत्र भटकंती करीत आहेत. शासनाच्या 18 नोव्हेंबर 1968 च्या निर्णयान्वये कुठल्याही उद्योगात 80 टक्‍के रोजगार हा स्थानिक लोकांना देण्याबाबत अधिनियम आहे. असे असताना कंपनीकडून स्थानिकांना डावलत परप्रांतीयांचा भरणा केला जात आहे. यात जिल्ह्यातील कुशल, सुशिक्षित बेरोजगारांवर अनेक वर्षांपासून अन्याय होत आहे. कंपनीत सुशिक्षित बेरोजगारांना काम द्यावे, कंपनीतील प्रदूषणामुळे परिसरातील शेतपिके आणि नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असल्याने प्रदूषण होणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्या, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्या आदी मागण्या उत्तम स्टील व्हॅल्यूचे महाव्यवस्थापक डी. के. मित्रा यांच्याशी चर्चेदरम्यान करण्यात आल्या.
समस्या सोडविल्यात न आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी ऍड. उज्ज्वल काशीकर यांनी दिला. महाव्यवस्थापकांनी 15 दिवसांत याप्रश्‍नी कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी शेख समीर, अमित गजभिये, सागर घोडे, शुभम जळगावकर, मंगेश मडावी, इम्रान शेख, मनीष भुजाडे, प्रेम मडावी, करण केवटे, रोशन वासेकर, मंगेश झामरे, समीर राऊत, राकेश पांडे, राजेंद्रसिंग जुनी, रोहित बैस आदींची उपस्थिती होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give locals a better job