संत्रा उत्पादकांना हेक्‍टरी एक लाख द्या : राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जून 2019

वरुड (जि. अमरावती) : संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे. जनावरांच्या जिवाची लाहीलाही होत असताना भाजप सरकार अजूनही जागे झाले नाही. विदर्भात पाण्याची पातळी बाराशे फूट खोलवर जाऊनसुद्धा पाच वर्षांत कोणतीही उपाययोजना वा पिण्याच्या पाण्याची तसेच शेतीच्या सिंचनाच्या पाण्याची शाश्‍वत सोय करण्यास लोकप्रतिनिधी निश्‍चितच कमी पडले आहेत. परंतु, आपले अपयश झाकून लढणाऱ्या चळवळीतील कार्यकर्त्यांचे हात छाटण्याची भाषा करणाऱ्या पुढाऱ्यांना शेतकरी आता माफ करणार नाही, असे मत लोणी येथील दुष्काळ पाणी परिषदेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटना लोणी शाखेच्या वतीने पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
शेट्टी म्हणाले की, ऊस कारखानदारीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झाला. त्याचप्रमाणे येथील शेतकऱ्यांच्या संत्र्यावर प्रक्रिया करणारा उद्योग उभा झाला पाहिजे. सत्ताधाऱ्यांना ब्राझीलच्या शेतकऱ्यांची चिंता आहे. येथील शेतकऱ्यांशी त्यांना देणे-घेणे नाही. शेतकऱ्यांच्या क्रांतीने अनेक सत्ता उलथून टाकल्या आहेत. शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळाल तर खबरदार, असा इशाराही त्यांनी दिला.
याप्रसंगी संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. प्रकाश पोफळे, राज्य उपाध्यक्ष सयाजी मोरे, महिला आघाडी अध्यक्ष रसिका ढगे, बापू कारंडे, दयाल राऊत, वासुदेव पोहरकर, नितीन टेंभे, प्रफुल्ल गोहाड, विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार उपस्थित होते. परिषदेचे आयोजन शिल्पा पवार, संदीप खडसे, ऋषिकेश राऊत, सुमित गुजर, फजलू रहमान, नीलेश कोरडे, सागर राऊत, गौरव गणोरकर, हर्षल चौधरी, वैभव टेकवडे, राजू मालपे, विकी बडगे, भूषण पोहरकर, दिनेश मालपे, मंगेश खोडस्कर, सूरज पाजणकर, राधेश्‍याम मेंढे, राजू मालपे, मनोज चिंचमलातपुरे यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

दुष्काळामुळे वाळलेल्या संत्रा झाडांच्या पंचनाम्याचे आदेश त्वरित देऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. तत्काळ पंचनामे झाले नाही तर शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढू
-राजू शेट्टी, माजी खासदार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give one million to the hector to the orange growers: Raju Shetty