वैश्‍विक धोरणाचा वेध

वैश्‍विक धोरणाचा वेध

- डॉ. फ्रॅंक जुगेन रीचर, अध्यक्ष, होरॅसीस 

शाश्‍वत भविष्यासाठी ‘होरॅसिस’ प्रयत्नशील आहे. विकसित आणि नव्याने विकसित होणारी बाजारपेठ यांच्यात समन्वय साधून नवीन व्यासपीठ निर्माण करण्याचे कार्य ही संस्था करत आहे. त्यांच्यातर्फे जागतिक स्तरावर ‘होरॅसिस ग्लोबल मीटिंग’ तसेच प्रादेशिक स्तरावर चीन, भारत, रशिया आणि अरब देशांना डोळ्यांसमोर ठेवून काही उपक्रम राबवले जातात. डॉ. रीचर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संचालकही होते. या काळात त्यांनी जागतिक अर्थकारण, व्यापार आणि राजकारण यांचा बारकाईने अभ्यास केला. जगभरातील महत्त्वाच्या उद्योजक, राजकारणी आणि बुद्धिवंतांबरोबर वावर असल्याने त्यांना आजच्या जगाचे कार्य कसे चालते आणि त्याची दिशा काय, याची चांगली जाण आहे. वैश्‍विक धोरण आणि आशियाई व्यवसाय यावर त्यांनी अनेक ग्रंथांचे लेखन केले आहे. ‘ग्लोबल फ्युचर’ आणि ‘सिक्‍स बिलीयन माइंडज अँड रिक्रिएटिंग एशिया’ हे त्यांचे अलीकडील ग्रंथ आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, ब्रुकिंग्ज इन्स्टिट्यूट, हार्वर्ड आणि बीजिंग विद्यापीठ, रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स आदी संस्थांमधील उच्च स्तरीय कॉर्पोरेट बैठकांत त्यांनी मार्गदर्शन केले आहे. इंटरनॅशनल हेरल्ड ट्रिब्युन, द फार इस्टर्न इकॉनॉमिक रिव्ह्यू, द स्ट्रेट टाइम्स, साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट यांच्यासारख्या जागतिक नियतकालिकांत त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. सीएनएन, बीबीसी, सीएनबीसी, सीसीटीव्ही (चायना सेंट्रल टेलिव्हिजन), व्हाइस ऑफ अमेरिका या वाहिन्यांवरील चर्चांमध्येही त्यांचा सहभाग असतो.

वित्तीय विकासाचे ‘लक्ष्य’
- पीटर व्‍हँडरवॉल, लीड, स्ट्रॅटेजिक ग्रोथ अँड इनोव्हेटिव्ह डेव्लपमेंट फायनान्सिंग, पॅलाडियम 
सध्या दुबईत वास्तव्याला असणाऱ्या पीटर यांनी सिडनी विद्यापीठातून बीए आणि मानसशास्त्रातील एमए पदवी मिळवली आहे. खासगी भांडवल आणि विकासासाठी साह्य यातील अंतर कमी करण्यावर गेली दोन वर्षे त्यांनी काम केले आहे. वीस वर्षे सरकारी संस्था, दाते आणि विविधांगी संघटनात्मक काम केल्यानंतर पीटर आता ‘पॅलाडियम’सोबत काम करीत आहेत. शाश्‍वत सकारात्मक परिणाम साधण्यासाठी वित्तीय विकासावर त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. लोकांच्या भल्यासाठी सार्वजनिक, खासगी आणि दाते यांच्या कार्याचा त्रिवेणी संगम केल्यास निधीची उपयुक्तता वाढून समाजहित साधले जाते, अशा तंत्रशुद्ध प्रणालीवर त्यांचा भर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com