"जीएमआर' करणार विमानतळाचे मेकओव्हर

File photo
File photo

"जीएमआर' करणार विमानतळाचे मेकओव्हर
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळाचा खासगी सार्वजनिक भागीदारीतून मेक ओव्हर करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी काढण्यात आलेल्या निविदेत जीएमआर एअरपोर्ट लिमिटेड कंपनीने सर्वाधिक महसूल देण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे विमानतळ विकासाचा रखडलेला रनवे प्रशस्त झाला आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण आणि भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाचा संयुक्त उपक्रम असलेल्या मिहान इंडिया लिमिटेडकडून नागपूर विमानतळाचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. विमानतळाच्या वर्ल्डक्‍लास विकासासाठी मार्च 2018 मध्ये प्रस्ताव तयार करण्यात आला. विविध प्रकारच्या प्रवासी सुविधा, टर्मिनल इमारतीसह विमानतळाच्या दर्जा सुधारणे, आधुनिकीकरण, संचालन आणि देखभालीचा या प्रस्तावात समावेश आहे. 30 वर्षांसाठी विमानतळाचे संचालन पूर्णपणे खासगी कंपनीकरवी करवून घेतले जाणार आहे. त्यासाठी काढण्यात आलेल्या निविदेवर शुक्रवारी बैठक पार पडली. त्यात जीएमआर कंपनीने सर्वाधिक महसून देण्याची तयारी दाखविली आहे. यामुळे लवकरच या कंपनीकडे नागपूर विमानतळाच्या विकासाची जबाबदारी येणार आहे.

विमानतळाच्या खासगीकरणासाठी सर्वाधिक बोली लावणारी कंपनी ठरल्याचा अभिमान आहे. विमानतळाला जागतिक दर्जा मिळवून देणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. यातून विदर्भाच्या विकासाला गती मिळेल.
-जीबीएस राजू,
व्यावसायिक अध्यक्ष, जीएमआर एअरपोर्ट.

भारतीय आणि जागतिक स्तरावरील विकास व क्षमतावाढीमुळे नागपूर विमानतळ दर्जेदार विमानतळाच्या रांगेत येणार आहे. सर्व औपचारिकता पूर्ण करून 2019 पूर्वी काम होईल.
-सिद्धार्थ कपूर,
कार्यकारी संचालक, जीएमआर एअरपोर्ट लिमिटेड.

वर्षभरातील प्रवासी : 2.18 दशलक्ष
मालवाहतूक : 7,800 मेट्रिक टन
मालवाहतुकीत देशातील क्रमांक : 17 वा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com