अबब! बकरीने दिली 5 पिल्लं! 

khamgao
khamgao

खामगाव : तालुक्यातील पिंप्री गवळी येथील शेतकऱ्याकडील बकरीने 5 पिलांना जन्म दिला. हा प्रकाराबाबत कुतहल व्यक्त होत आहे. समृद्धी शेतकरी स्वयंसहायता गट पिंप्री गवळी, ह्या शेतकरी गटाने मागील 8 महिन्यापासून बकरी, व कुकुटपालनास सुरुवात केली. 

उत्कृष्ट नियोजन व एकत्रित पण काम करण्याची तयारी या गटातील सदस्यांची असल्यामुळें काही दिवसातच ह्या गटाने, ह्या जोडधंद्यात यश संपादन कडले आहे. हा गट आपल्याकडे 100 बकरी व बोकड एकत्रीत पणे नियमित ठेवतो, जास्त झालेल्या बकरी व बोकड विकून ही संख्या कायम ठेवता, या गटाने ह्यामध्ये जातींवन्त गावरान, उस्मानाबादी, सिरोही बकरी पालन केले आहे. आज सकाळी हया गटावर एक आश्चर्य कारक घटना घडली एका बकरीने एक नाही दोन नाही तर तब्बल 5 पिल्लांना जन्म दिला आहे, हे पाचही पिल्ल सुदृढ आहेत. 

गटातील सदस्य रामेश्वर काळे, पुंडलिक इटीवाले व मुकुंदा बुंदे हे त्या बकरी व पिल्लं यांची काळजी घेत आहेत.संघातीलउत्तम व्यवस्थापन हे ह्या गटाच्या यशाचे गमक आहे अशी माहिती चेतन फुंडकर अध्यक्ष, व जितेंद्र कुयरे सचिव,समृद्धी शेतकरी गट पिंप्री गवळी, ता खामगाव जि बुलढाणा यांनी दिली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com