किडनाशकासोबत आता गॉगल आणि मास्क

विनोद इंगोले 
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

नागपूर : राज्यात यापुढे कोणतेही किडनाशक विक्री करताना त्यासोबत मास्क आणि गॉगल देणे विक्रेत्यांना बंधनकारक करण्यात आले आहे.
राज्यात यापूर्वी फवारणी दरम्यान घडलेल्या विषबाधांवर नियंत्रणासाठी हा
पर्याय अवलंबिण्यात आल्याची माहिती कृषी खात्याच्या विश्‍वसनीय सूत्रांनी
दिली.

गेल्यावर्षीच्या हंगामात बोंडअळीच्या नियंत्रणाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी, शेतमजूरांना विषबाधा होण्याचे प्रकार घडले होते. याची सर्वाधिक झळ यवतमाळ जिल्हयात बसली. तब्बल 19 जणांना या घटनेत आपला जीव गमवावा लागला. न्यायालयाच्या आदेशानंतर  मृताच्या कुटूंबियांना चार लाख रुपयांची मदत देण्यात आली. राज्यात फवारणी दरम्यान झालेल्या विषबाधेमुळे दगावणाऱ्यांची संख्या 48 होती. त्याची दखल घेत यावर्षी फवारणी दरम्यान होणाऱ्या विषबाधांच्या घटनांवर नियंत्रणाचे प्रयत्न कृषी विभागाकडून केले जात आहेत. त्याच प्रयत्नाअंतर्गंत यावर्षी किडनाशकासोबत मास्क आणि गॉगल देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.

किटकनाशक विक्रेत्यांना किडनाशकाची खरेदी करणाऱ्यांना हे सुरक्षाविषयक साहित्य दयावे लागेल, तसे आदेश देण्यात आले आहेत.

"गेल्यावर्षी यवतमाळसह राज्याच्या विविध भागात फवारणी दरम्यान
विषबाधेचे प्रकार घडले होते. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्याकरीता यावर्षीच्या हंगामात किडनाशक विक्रेत्यांना गॉगल आणि मास्क देणे अनिवार्य करण्यात आले
आहे.'
- विजय कुमार, मुख्य सचिव (कृषी)

Web Title: goggle and mask is with pesticides