सोने 32 हजारांपर्यंत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नागपूर - सध्या लग्नसराई सुरू असून अक्षय्य तृतीयेचा मुहूर्तावर दागिने खरेदीचा मुहूर्त आहे. परिणामी अक्षय तृतीयेला एक दिवस शिल्लक असताना सोन्याच्या दराने 32 हजारांची पातळी गाठली आहे. दहा ग्रॅमला 31 हजार 950 रुपये मोजावे लागणार आहे. यापूर्वीच्या अक्षय्य तृतीयेला सोन्याचा भाव 30 हजारांच्यावर गेला नव्हता. यावेळी मात्र तो 32 हजारापर्यंत पोचला आहे. 

2016 सालच्या अक्षय्य तृतीयेला सोन्याचा दर 29 हजार 670 रुपये इतका होता. त्यावेळी तो विक्रम होता. ती पातळीही यंदाच्या अक्षय्य तृतीयेला ओलांडली गेली आहे. भावाचा आलेख वाढत असला तरी अक्षय्य तृतीयेच्या सोने खरेदीच्या प्रमाणावर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता नाही असे सराफ व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. कारण अक्षय्य तृतीया हा सण शुभफलदायी होणारा असून साडेतीन मुहूर्तापैकी तो एक आहे. या दिवशी केलेली खरेदी ही शुभ आणि लाभकारी मानली जाते. यामुळेच या दिवशी सोने खरेदीची प्रथा ही पारंपरिक स्वरूपाची आहे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ होईल. लवकरच प्रतिदहा ग्रॅम सोन्याचे भाव 35 हजारांवर जाईल असे सराफ बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले. 

अशी आहेत झळाळीची कारणे 
-सीरिया आणि अमेरिकेत वाढलेला तणाव 
-रशियाने घेतलेली सीरियाची बाजू 
-सुरक्षित गुंतवणूक म्हणून ग्राहकांचा ओढा पुन्हा सोन्याकडे 

सोन्याचा चढता आलेख 
दर---29670---...---31950 
वर्ष---2016---2017---2018 

Web Title: Gold up to 32 thousand