गोंड माडिया हिन्दू धर्मातील चालीरीतींचा स्वीकार करणार नाही

मनोहर बोरकर
सोमवार, 16 एप्रिल 2018

एटापल्ली - तालुक्यातील प्रसिध्द सुरजागड लोहखनिज पहाड़ी परिसरात अहेरी, मुलचेरा, सिरोंचा, भामरागड व एटापल्ली अशा पाच तालुक्यातील ग्रामसभा प्रतिनिधिमंडळ सभेचे आयोजन सोमवार (ता 9) ला करण्यात आले होते. यावेळी गोंड माड़िया व इतर आदिवासी समाज यापुढे हिन्दू धर्मातील सामाजिक रूढ़ी परंपरांचे पालन, देवीदेवतांचे पूजन तसेच लग्न व श्राद्ध विधी करणार नाही अशी शपथ घेण्यात आली. 

जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ गोंडी धर्म असतांना व गोंडी धर्म परंपरा आदिवासी समाज रचनेत तंतोतंत बसत असतांना, आम्हाला इतर धर्मातील रूढ़ी परंपरा स्वीकारण्याची गरज नसल्याचे ग्रामसभा प्रतिनिधि आणि जिल्हा परिषद सदस्य एड लालसू नोगोटी यांनी मार्गदर्शनातून सूचविले. आदिवासी समाज हा निसर्ग सानिध्यात वास्तव्य करणारा व निसर्ग पूजक असून, निसर्गा व्यतितिक्त इतर देवीदेवतांचे पूजन करणे हे परंपरा विरुध्द आहे. त्यामुळे लग्न समारंभ व लग्न विधी निसर्ग पूजनानेच पार पाडले जातात. तसेच अंत्यविधि व श्राद्धपक्ष आदिवासी समाज रूढ़ी व हिन्दू धर्म रूढ़ी यात फार मोठी विसंगती आहे. त्यामुळे आदिवासी समाजाने निसर्ग पूजन व नैसर्गिक विधिचेच पालन केले पाहिजे असे मत सैनु गोटा यांनी व्यक्त केले

गेल्या काही काळापासून आदिवासी समाजातील काही मंडळी हिन्दू धर्म परंपरेतील चालीरीती व धार्मिक विधीचा स्वीकार करतांना दिसून येतात. अशावेळी ग्रामसभाकडून अशा प्रकारे सामाजिक रूढ़ी परंपरेचे जतन करण्यास केले जात असलेले प्रयत्न सामाजिक एकोपा दृढ़ करण्याच्या दृष्टिचे मौलिक पाऊल मानले जात आहे. 

यावेळी आदिवासी विद्यार्थी संघटना तालुका अध्यक्ष नंदू मट्टामी, ग्रामपंचायत येरमनार तालुका अहेरीचे सरपंच बालाजी गावड़े, पंचायत समिती सदस्य शिला गोटा, माजी पंचायत समिति सदस्य मंगेश आलामी, रामा तुमरेटी, बालाजी आलामी, इत्यादी अहेरी, भामरागड, मुलचेरा, सिरोंचा व एटापल्ली तालुक्यातील ग्रामसभा प्रमुख प्रतिनिधिसह बहुसंख्य आदिवासी समाज बांधव उपस्थित होते

Web Title: gond madia tribe will not follow hindu rituals