गोंदिया : एक्‍स्प्रेस रेल्वेगाडीत सापडला 15 किलोंचा गांजा

गोंदिया : जप्त केलेला गांजा व उपस्थित रेल्वे पोलिस.
गोंदिया : जप्त केलेला गांजा व उपस्थित रेल्वे पोलिस.

गोंदिया : येथील रेल्वेस्थानकावर थांबलेल्या भुवनेश्‍वर-कुर्ला एक्‍स्प्रेसच्या बोगीतून बेवारस बॅगमधून 15 किलो 603 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी (ता. 18) रात्री साडेदहाच्या सुमारास रेल्वे पोलिसांनी केली. घटनास्थळाहून जप्त केलेला गांजा 1 लाख 56 हजार 30 रुपये किमतीचा असून, आरोपींकडून तस्करी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भुवनेश्‍वर-कुर्ला एक्‍स्प्रेस (गाडी क्रमांक 12880) येथील रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक तीनवर थांबली होती. गुप्त माहितीवरून रेल्वे सुरक्षा पोलिसांनी कोच क्रमांक 1 मध्ये तपासणी केली. त्यांना बोगीतील बर्थ क्रमांक 73 च्या खाली लाल रंगाची ट्रॉली बॅग बेवारस अवस्थेत आढळून आली. त्यांनी बॅग कुणाच्या मालकीची आहे, अशी विचारणा प्रवाशांना केली. परंतु, एकाही प्रवाशाने बॅग आपली आहे, असे म्हटले नाही.

बेवारस बॅग ताब्यात
दरम्यान, रेल्वे पोलिसांनी बेवारस बॅगला ताब्यात घेत ठाण्यात आणले. तिथे तपासणी केली असता बॅगमध्ये दोन पॅकेट दिसून आले. त्यांनी ते पाकीट उघडून पाहिले. या वेळी पाकीटमधून दुर्गंधी येत होती. तपासणी केल्यावर गांजा असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती ताबडतोब मंडळ सुरक्षा आयुक्‍त नागपूर व रेल्वे सुरक्षा पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आली. परंतु, रात्रीला उशिरापर्यंत कारवाई झाली नाही.

पंचासमक्ष केला पंचनामा
मंगळवारी (ता. 19) श्‍वानपथक गोंदियाचे ओमप्रकाश बारेवार यांच्याकडून गांजा असल्याचे प्रमाणपत्र घेण्यात आले. नायब तहसीलदार सचिन पाटील व पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला. घटनास्थळाहून जप्त केलेला गांजा 15 किलो 603 किलोग्रॅम आहे. त्याची किंमत 1 लाख 56 हजार 30 रुपये आहे.

या कर्मचाऱ्यांनी केली कारवाई
ही कारवाई सुरक्षा नियंत्रण कक्ष नागपूरकडून मिळालेल्या गुप्त माहितीवरून मंडळ सुरक्षा आयुक्‍त आरपीएफ नागपूरचे आशुतोष पांडे व सुरक्षा अधिकारी ए. के. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल पाटील, उपनिरीक्षक एम. पी. राऊत, उपनिरीक्षक विनेक मेश्राम, प्रधान आरक्षक के. यू. वाघाडे, आरक्षक रहांगडाले, आर. एस. बोरकर व टॉस्क टीमचे प्रधान आरक्षक जी. आर. मडावी, प्रशांत दलाई, नासीर खान, डॉग स्कॉडचे प्रधान आरक्षक ए. बी. लिल्हारे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com