गोंदियात सहायक फौजदाराला लाच घेताना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

गोंदिया : गुन्ह्यात कोर्टातून सुटण्यास मदत होईल, अशी केस तयार केली आहे. याकरिता पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगत ही रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारताना सहायक फौजदाराला अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (ता. 30) येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात केली. शब्बीर अहमद शेख (वय 57) असे लाच घेणाऱ्या सहायक फौजदाराचे नाव आहे.

यातील तक्रारदार हे मजूर आहेत. एप्रिल महिन्यात त्यांचे शेजारच्यांसोबत भांडण झाले. तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलिसांनी यातील तक्रारदार, त्यांचे दोन भाऊ व मुलगा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर सहायक फौजदार शब्बीर शेख याने पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये कोर्टातून सुटण्यास मदत होईल, अशी केस तयार केल्याचे सांगत तक्रारदाराकडे 5 हजार रुपयांची मागणी केली. परंतु, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुरुवारी (ता. 29) तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून पथकाने पडताळणी करीत शुक्रवारी गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात सापळा रचला. या वेळी तक्रारदाराकडून 5 हजार रुपये घेताना शब्बीर शेख याला रंगेहाथ अटक केली. त्याच्याविरुद्ध गोंदिया ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gondia : arrested for taking bribe to Assistant trooper