Vidhan Sabha 2019 : गोंदिया जिल्ह्यात सरासरी 50 टक्के मतदान

File photo
File photo

गोंदिया : जिल्ह्यातील गोंदिया, अर्जुनी मोरगाव, तिरोडा आणि आमगाव या विधानसभा क्षेत्रांत दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 50 टक्के मतदान झाले.
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील 316 मतदान केंद्रे, तिरोडा 295, गोंदिया 361 तर, आमगाव विधानसभा क्षेत्रातील 310 अशा एकूण 1282 मतदान केंद्रांवरून सोमवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. गोंदिया व तिरोडा विधानसभा क्षेत्रांत सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान झाले. अर्जुनी मोरगाव व आमगाव या विधानसभा क्षेत्रांत सुरक्षेच्या दृष्टिकोणातून सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत मतदान घेण्यात आले. आमगाव विधानसभा क्षेत्रात दुपारी तीनपर्यंत 49.85 टक्के तर, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात दुपारी 73.39 टक्के मतदान झाले. गोंदिया विधानसभा क्षेत्रात 35 टक्के तर, तिरोडा विधानसभा क्षेत्रात 32.60 टक्के इतके सरासरी मतदान झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com