गोंदिया जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

गोंदिया : जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यात मोठे आर्थिक नुकसान झाले. शासनाने सर्वेक्षण करून आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तर, मंगळवारी सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती.
रविवारी मध्यरात्री आणि सोमवारी दुपारनंतर जिल्हाभर पावसाने मुसळधार हजेरी लावल्यानंतर मंगळवारीदेखील पावसाची संततधार सुरूच होती. खमारी मंडळात 67.00 मि. मी., परसवाडा 67.00 मि. मी., कट्टीपार 74.20 मि. मी., आमगाव 66.20 मि. मी. तर ठाणा मंडळात 67.40 मि. मी. पाऊस पडला असून, अतिवृष्टीची नोंद हवामान खात्याने केली आहे.

 इटियाडोह धरण 92 टक्के भरले
इटियाडोह धरण 92 टक्के भरले आहे. नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सोमवारी तब्बल दीड ते दोन तास पाऊस झाला. या पावसामुळे शहरासह जिल्ह्यातील संपूर्ण रस्त्यांवर पाणी साचले होते. दरम्यान, मंगळवारीदेखील संततधार पाऊस झाला. पुजारीटोला धरणाची पाण्याची पातळी वाढल्यामुळे धरण नियंत्रणाकरिता रात्री 12 वाजता दोन दरवाजे उघडण्यात आले होते. आज, सकाळी 6 वाजता दरवाजे बंद करण्यात आले.

घरे व गोठ्यांची पडझड
तिरोडा तालुक्‍यातील खैरलांजी येथे एक घर अंशतः तर बिहरीया येथे 8 घरे अंशतः पडली. यात एक लाख 15 हजार रुपयांचे नुकसान झाले. पालडोंगरी येथील मधुकर ठाकरे यांच्या गोठ्याचे नुकसान झाले. यात दहा हजार रुपयांचे नुकसान झाले. गोरेगाव तालुक्‍यातील सटवा येथील मळनबाई ठाकूर यांचे घर सकाळी 6 वाजता कोसळले. यात त्यांचेही मोठेही नुकसान झाले. पालडोंगरी येथील रामदास मलये यांचे घर कोसळले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gondia district receives heavy rainfall