गोंदियाच्या माजी नगराध्यक्षांचा विद्युत धक्‍क्‍याने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

गोंदिया : येथील नगर परिषदेचे माजी अध्यक्ष गोविंद शेंडे यांचा विद्युत धक्‍क्‍याने मृत्यू झाला. ही घटना आज, सोमवारी सकाळी मरारटोली येथील त्यांच्या घरी घडली. घटनेत त्यांचा मुलगा सचिन शेंडे व स्नुषा गंभीर जखमी झाले आहेत.

गोविंद शेंडे यांच्या स्नुषा आज सकाळी कपडे वाळू घालण्याकरिता घराच्या गच्चीवर गेल्या होत्या. दोरीवर कपडे वाळू घालत असताना लोखंडी अँगलला त्यांचा स्पर्श झाला. या अँगलवर विद्युत प्रवाह असल्याची माहिती आहे. विद्युत स्पर्शाने त्या जोरात ओरडल्या. त्यांना वाचविण्यासाठी त्यांचे पती सचिन गच्चीवर गेले. पत्नीला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांनाही विजेचा धक्का बसला. गच्चीवर पडल्याचा जोरात आवाज आल्याने घरातील खोलीत बसलेले गोविंद शेंडे धावत गच्चीवर गेले. मुलगा व सून यांना वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. तेही खाली कोसळले. डोक्‍याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सचिन शेंडे व त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gondia ex-city president dies in electric shock

टॅग्स