गोंदियात आय लव्ह यू पाकिस्तान लिहिलेले फुगे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

फुग्यांचे पॅकेट २५ दिवसापूर्वी गोंदियात आणले गेले. गोंदिया येथील फुगा व्यापारी वकील रामचंद्र बेलानी यांनी मुंबईच्या मिरची बाजार येथून फुग्यांचे ५० पॅकेट आणले होते. त्यातील ४० पॉकेट त्याने ह्रजतकुमार छोतलानी याला विकले. छोतलानी याने दौलत मेघांनी याला विकले. मेघांनी याने नवरात्रोत्सवात फुगे विकले.

गोंदिया : गोंदिया शहरात 'आय लव्ह यू पाकिस्तान' असे लिहिलेले फुगे युवा सेना कार्यकर्त्यांना आढळले. त्यांनी फुगे जप्त करून पोलिसांच्या स्वाधीन केले.  

फुग्यांचे पॅकेट २५ दिवसापूर्वी गोंदियात आणले गेले. गोंदिया येथील फुगा व्यापारी वकील रामचंद्र बेलानी यांनी मुंबईच्या मिरची बाजार येथून फुग्यांचे ५० पॅकेट आणले होते. त्यातील ४० पॉकेट त्याने ह्रजतकुमार छोतलानी याला विकले. छोतलानी याने दौलत मेघांनी याला विकले. मेघांनी याने नवरात्रोत्सवात फुगे विकले. यातील आय लव्ह यू पाकिस्तान असे लिहिलेला एक फुगा एका मुलाकडे युवा सेना कारकर्त्यांना गांधी चौकात दिसला.  त्यांनी तो फुगा जप्त करून शहर पोलिसांच्या स्वाधीन केला. त्यानंतर पोलिसांनी आणखी चौकशी करीत व्यापाऱ्यांना आज, बुधवारी पोलिस ठाण्यात बोलावले. जबाब नोंदवून सोडून दिले.

मुंबईच्या मिरची बाजारातून फुगे आणल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्या दिशेने तपास सुरू असल्याचे ठाणेदार मनोहर दाभाडे यांनी सांगितले.

Web Title: Gondia news bubble in gondia