गोंदिया: गोरेगाव तालुक्‍यातील 17 गावात महिलांना मिळणार सरपंच होण्याची संधी

डिलेश्वर पंधराम
शनिवार, 8 जुलै 2017

गोरेगाव (जि. गोंदिया) - गोरेगाव तालुक्‍यातील 29 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या नोव्हेबरमध्ये होणार आहेत. या निवडणुकीत सरपंचाची निवड थेट गावकरी करणार असून 17 महिलांना सरपंच होण्याची संधी मिळणार आहे.

गोरेगाव (जि. गोंदिया) - गोरेगाव तालुक्‍यातील 29 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या नोव्हेबरमध्ये होणार आहेत. या निवडणुकीत सरपंचाची निवड थेट गावकरी करणार असून 17 महिलांना सरपंच होण्याची संधी मिळणार आहे.

सन 2011 च्या जनगणनेनुसार येत्या नोव्हेबर महिन्यात 29 ग्रामपंचायतीच्या 90 प्रभागातील 243 सदस्यांकरिता नुकतेच प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. पण सन 2015 ते 2020 या पाच वर्षाकरीता सरपंच पदासाठी यापुर्वीच आरक्षण काढण्यात आले होते शासनांनी पंचायत राज व्यवस्था सुरु करण्याचे जाहीर केले असुन राखीव जागेकरीता सातवी पास ही शिक्षणाची अट लावली आहे व सरपंच सदस्य, ग्रामसेवकांच्या सहकार्याने न निवडता थेट जनता सरपंचाची निवड करणार आहेत. 29 ग्रामपंचायतीची लोकसंख्या 53 हजार 968 असून अनुसुचित जातीची लोकसंख्या 6 हजार 131 व अनुसूचित जमातीची लोकसंख्या 5 हजार 727 आहे. यामुळे सरपंच, सदस्यांचे आरक्षण लोकसंख्येच्या आधारे काढण्यात आले आहे.

सर्वसाधारण महिला सरपंच तुमखेडा बु, कुऱ्हाडी, तिमेझरी, गणखैरा, मोहाडी, बाम्हणी, पालेवाडा, मोहगाव तिल्ली, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सरपंच डव्वा, सिलेगाव, दवडीपार, अनुसूचित जमाती महिला सरपंच झांजिया, हौसीटोला, भडंगा, अनुसुचित जाती महिला सरपंच हिरडामाली, कलपाथरी, पलखेडा, अशा एकूण 17 गावात महिलांना सरपंच होण्याची संधी मिळणार आहे. सर्वसाधारण सटवा, बघोली, पुरगाव, बबई, कमरगाव, मुरदोली, नागरिकांचा मागास प्रवर्ग कटंगी बु, बोटे, आंबेतलाव, पिंडकेपार, अनुसुचित जमाती घुमर्रा, अनुसुचित जाती मुडीपार या प्रवर्गातून थेट सरपंचाची निवड होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय विभागाने दिली आहे.

Web Title: gondia news goregaon news marathi news sakal news sarpanch news