कुख्यात गुंड देशी कट्‌टयासह जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

भंडारा : अनेक गुन्ह्यात वॉटेंड असलेला गोंदिया येथील कुख्यात फरार आरोपी शहजाद ऊर्फ बंदे शब्बीर खान पठाण(वय 25) रा. रेलटोली पाल चौक गोंदिया यास जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या रेड स्कॉट पथकाने मंगळवारी(ता.17) रात्री बेला येथे पकडले. त्याच्याकडील देशी कट्टा व दोन जिवंत काडतूस ताब्यात घेण्यात आले.
गोंदिया शहर पोलिस ठाणे, रामनगर, रावणवाडी, गोंदिया ग्रामीण परिसरात अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये असलेल्या या आरोपीवर खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, अपहरण, खंडणी तसेच मोक्का अशा गंभीर गुन्ह्यात सहभाग आहे. गेल्या वर्षभरापासून शहजाद हा फरार असून, गोंदिया पोलिस त्याच्या शोधात होते.

वेशांतर करून वास्तव्य
पोलिसांनी चकमा देण्यासाठी शहजाद ऊर्फ बंदे शब्बीर खान पठाण हा वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करीत होता. त्याच्या दहशतीपोटी कोणी त्याची माहिती देण्यास तयार होत नसल्याने पोलिसांना त्याचा शोध घेणे अवघड झाले होते. सदर आरोपी हा भंडारा जिल्ह्याच्या हद्दीत असल्याची माहिती प्राप्त झाली. जिल्हा पोलिस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात रेड स्कॉटचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र आडोळे, सहायक फौजदार अश्‍विनकुमार मेहर, पोलिस हवालदार रूपचंद जांगळे, प्रदीप डहारे, विनोद शिवणकर, धीरज पिदुरकर, सचिन गाढवे या पथकाने व शीघ्र कृती दलाच्या जवानांनी सापळा रचून बेला येथील बांधकाम सुरू असलेल्या ढाब्यावर पकडले. झडती घेतली असता, त्याच्याकडे देशीकट्टा व दोन जिवंत काडतूस आढळून आले.

Web Title: Gondia police news