गोसीखुर्दचे पाणी सोडले; वैनगंगेला पूर

संदीप रायपुरे
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

गेल्या आठ दिवसापासून सतत कोसळणार्या पावसामुळे वर्धा नदीला पूर आला होता. यामुळे चंद्रपूर राजुरा, महाराष्ट्र तेलंगणाला जोडाणारा पोडसा पुल पाण्याखाली आला होता. या पुरामुळे परिसरातील हजारो हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले होते.

गोंडपिपरी जि. चंद्रपूर - वर्धा नदीचा पुर ओसरू लागल्यानंतर आता वैनगंगा नदीला पूर आला आहे. काल रात्री गोसीखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने वैनगंगेची दुथळी वाहू लागली आहे. दुपारपर्यंत गोंडपिपरी आष्टी सिमेवरील नदीपुलाच्या बरोबरीने पाणी ओसंडून वाहत होते. वैनगंगा नदीला आलेला पुर यात पुलावरील मार्गाची दुरावस्था बघता पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने पहारा लावला आहे.

गेल्या आठ दिवसापासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे वर्धा नदीला पूर आला होता. यामुळे चंद्रपूर राजुरा, महाराष्ट्र तेलंगणाला जोडणारा पोडसा पुल पाण्याखाली आला होता. या पुरामुळे परिसरातील हजारो हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले होते. एकीकडे वर्धा नदीला महापूर असतांना वैनगंगा नदीला मात्र पाहिजे त्या प्रमाणात पाणी नव्हते. अशात काल रात्री गोसीखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात आले. यामुळे आज सकाळपासूनच वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली.

आज दूपारपर्यंत वैनगंगा नदीच्या आष्टी पुलाच्या बारोबरीने पाणी वाहत होते.पाणी वाढण्यावर जोर असून पूल पाण्याखाली येण्याची शक्यता बळावली आहे. पुन्हा गोसीखुर्दचे पाणी सोडल्यास हा मार्ग बंद होऊ शकतो.
दरम्यान पूरपरिस्थिती बघता गोंडपिपरी व आष्टी, पोलिसांनी या पुलावर सुरक्षेच्या दृष्टीने पहारा वाढविला आहे. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणार्या या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते.अशात नदीला पाणी वाढत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने गोंडपिपरीचे ठाणेदार प्रवीण बोरकुटे, आष्टिचे पोलिस उपनिरिक्षक नितेश गोहणे यांनी आपआपल्या टिमला पुलावरील सुरक्षेसाठी सक्त सुचना दिल्या आहेत.

आष्टी पुलावर पाणी बरोबरीत आले असून पूर येण्याची शक्यता आहे याची पूर्वतयारी आपण केली असून सुरक्षेच्या दृष्टीने पुलावरील दोन्ही बाजुने पहारा लावण्यात आला आहे. - प्रविण बोरकुटे, ठाणेदार गोंडपिपरी.

Web Title: Gongkhurds water leaves flood in Wainganga