आनंदवार्ता! "जिजाऊ शोध संस्थान'साठी 20 कोटी

नितीन गडकरी
नितीन गडकरी

नागपूर : महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांचे मार्केटिंग व्हावे यासाठी जिजाऊ शोध संस्थान उद्योजिका भवनात प्रदर्शन केंद्रासाठी सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे 10 कोटी देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केली. या प्रकल्पाला यापूर्वीच राज्य सरकारने 10 कोटी दिले असून, आणखी 10 कोटी देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या प्रकल्पाला आता 20 कोटींचा अतिरिक्त निधी मिळणार आहे.
शंकरनगर येथील जिजामाता सभागृहाजवळ शुक्रवारी जिजाऊ शोध संस्थान महिला उद्योजिका भवन प्रकल्पाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. महिलांनी तयार केलेल्या विक्रीमधूनच त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे. या उत्पादनांची ग्राहकांशी ओळख व्हावी, त्यांच्या उत्पादनांचे मार्केटिंग व्हावे यासाठी सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने याच प्रकल्पामध्ये प्रदर्शन केंद्र साकारण्यात यावे. या केंद्रामध्ये 700 ते 800 आसनांचे सभागृह, डिजिटल स्क्रीन, राउंड टेबल कॉन्फरन्स हॉल, ई-लायब्ररी, सौरऊर्जा पॅनल असे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण प्रदर्शन केंद्र तयार करावे, अशी सूचना नितीन गडकरी यांनी महापालिकेला केली.
महिलांना स्वयंरोजगाराचे धडे देण्यासाठी प्रभागात प्रशिक्षण कार्यक्रम घ्यावे, यासाठी नगरसेविकांना सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग विभागाद्वारे सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शहरातील महिलाच्या प्रगतीसाठी काही करण्याची इच्छा सुरुवातीपासूनच होती. त्यामधून महिलांच्या सक्षमीकरणाला बळ देणाऱ्या जिजाऊ शोध संस्थानची संकल्पना पुढे आली. राज्य सरकारने केलेल्या मदतीतून हे स्वप्न आता पूर्ण होत आहे, असे महापौर जिचकार म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com