आनंदवार्ता! 50 रुपयांत दिवसभर प्रवास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

शहर बसमध्ये 50 रुपयांत दिवसभर प्रवास!
नागपूर : दिवसभरात शहर बसमधून कामानिमित्त अनेकदा प्रवास करताना अनेकांची शंभराची नोट खर्च होते. अशा नागरिकांना दिलासा देत महापालिकेच्या परिवहन समितीने 50 रुपयांत दिवसभर कुठल्याही मार्गावर कितीही वेळा प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. परिवहन समितीच्या बैठकीत सोमवारी या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्याचे समिती सभापती बंटी कुकडे यांनी नमूद केले.

महापालिकेत परिवहन समितीची बैठक पार पडली. बैठकीत आपली बस सेवेमध्ये एकलव्य योजनेद्वारे एकदा 50 रुपयांची पास काढल्यानंतर नागरिकांना दिवसभर शहरात कोणत्याही भागामध्ये प्रवास करता येणार आहे. यामुळे शहरात विविध कामांसाठी दिवसभर आपली बसने फिरणाऱ्या नागरिकांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नाही, असेही कुकडे यांनी सांगितले. दिवसभर फिरणाऱ्यांच्या निम्म्या पैशाची बचत होणार आहे. पुढील महिन्यात आपली बसच्या ताफ्यात महिलांसाठी इलेक्‍ट्रिकवरील "तेजस्विनी बस' दाखल होणार आहे. या बसमधील चालक, वाहक व बस आगारातील कर्मचारीही महिलाच राहणार असून, शहीद कुटुंबातील मुलीच्या हस्ते पर्यावरणपूरक तेजस्विनी बसचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे कुकडे यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news! All day travel in 50 rupees