आनंदवार्ता... मैयर स्थानकावर सर्वच गाड्यांना थांबा

file photo
file photo

नागपूर  : नवरात्रोत्सवादरम्यान मैयर येथे भव्य यात्रा भरते. नागपूरहून दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. भाविकांच्या सुविधेसाठी मैयरमार्गे धावणाऱ्या सर्वच प्रवासी रेल्वेगाड्यांना मैयर रेल्वेस्थानकावर थांबा देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. या व्यवस्थेमुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
29 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात व त्यानंतरचे काही दिवस प्रवासी रेल्वेगाड्यांना तात्परत्या स्वरूपात मैयर स्थानकावर थांबा राहणार आहे. नागपूरहून धावणारी 11045 छत्रपती शाहू टर्मिनस-धनाबाद दीक्षाभूमी साप्ताहिक एक्‍स्प्रेस 3 ते 10 ऑक्‍टोबरदरम्यान, 12669 चेन्नई सेंट्रल-छपरा गंगाकावेरी द्विसाप्ताहिक एक्‍स्प्रेस 29 सप्टेंबर ते 12 ऑक्‍टोबरदरम्यान, दररोज धावणारी 12791 सिकंदराबाद- दानापूर एक्‍स्प्रेस 28 सप्टेंबर ते 12 ऑक्‍टोबरदरम्यान, 12578 मैसूर-दरभंगा भागमती साप्ताहिक एक्‍स्प्रेस 28 सप्टेंबर ते 12 ऑक्‍टोबरदरम्यान, 17610 पूर्ण-पाटणा साप्ताहिक एक्‍स्प्रेस 4 ते 11 ऑक्‍टोबरदरम्यान मैयर स्थानकावर थांबेल. या सुविधेमुळे मैयरला दर्शनासाठी जाऊ इच्छिणाऱ्या नागपूरकर भाविकांची मोठी सोय होणार आहे.
सोबतच परतीचा प्रवास सुखकर व्हावा या दृष्टीने नागपूरकडे येणाऱ्या गाड्यांनाही थांबा असणार आहे. 11046 धनाबाद-छत्रपती शाहू टर्मिनस दीक्षाभूमी साप्ताहिक एक्‍स्प्रेस 30 सप्टेंबर ते 7 ऑक्‍टोबरदरम्यान, 12670 छपरा-चेन्नई सेंट्रल गंगाकावेरी द्विसाप्ताहिक एक्‍स्प्रेस 30 सप्टेंबर ते 9 ऑक्‍टोबरदरम्यान, दररोज धावणारी 12792 दानापूर-सिकंदराबाद एक्‍स्प्रेस 28 सप्टेंबर ते 12 ऑक्‍टोबरदरम्यान, 12577 दरभंगा-मैसूर भागमती साप्ताहिक एक्‍स्प्रेस 1 ते 8 ऑक्‍टोबरदरम्यान, 17609 पाटणा-पूर्ण साप्ताहिक एक्‍स्प्रेस 29 सप्टेंबर ते 6 ऑक्‍टोबरदरम्यान मैयर स्थानकावर थांबेल.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com