पांढऱ्या सोन्याला झळाळी! 

अनुप ताले
बुधवार, 24 एप्रिल 2019

अकोला : जिल्ह्यात सर्वच ठिकाणी आता कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार रुपयांहून अधिक भाव मिळत असून, सोमवारी (ता.२२) अकोट तालुक्यात ६५७५ रुपये भाव मिळाला. कापसाची मागणी व उपलब्धता लक्षात घेता, लवकरच कापसाचे दर सात ते साडेसात हजारावर पोहचण्याची शक्यता बाजार विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. 

अकोला : जिल्ह्यात सर्वच ठिकाणी आता कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार रुपयांहून अधिक भाव मिळत असून, सोमवारी (ता.२२) अकोट तालुक्यात ६५७५ रुपये भाव मिळाला. कापसाची मागणी व उपलब्धता लक्षात घेता, लवकरच कापसाचे दर सात ते साडेसात हजारावर पोहचण्याची शक्यता बाजार विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. 

दशकात जिल्ह्यातील कापसाचे सरासरी उत्पादन लक्षात घेतल्यास, दरवर्षी उत्पादनाचा आलेख वाढत असून, सरासरी आठ ते दहा लाख क्विंटल उत्पादन झाल्याच्या नोंदी आहेत. यावर्षी मात्र शेतकऱ्यांना एकरी चार ते दहा क्विंटल एकरी कापूस उत्पादन घेता आले. त्यामुळे आवकसुद्धा घटली असून, हंगामात तीन ते चार क्विंटल कापूस उत्पादन घटल्याचे व्यापारी वर्गाचे म्हणने आहे. दसरा-दिवाळी व दिवाळीनंतरही महिनाभर कापसाचे दर वाढून प्रतिक्विंटल ५५०० ते ६००० रुपये दराने शेतकऱ्यांना भाव मिळाला. त्यानंतर मात्र, दर घसरण होऊन चार ते साडेचार हजारावर भाव येऊन ठेपले. आता मात्र, पुन्हा कापसाने मुसंडी घेतली असून, प्रतिक्विंटल साडेसहा हजार रुपये भाव मिळत आहे. देशात यंदा ३४० लाख कापसाच्या गाठीचे उत्पादन अपेक्षित केले जात होते. मात्र सर्वत्र उत्पादन घटल्याने, आवक कमी आणि मागणी अधिक, अशी स्थिती महाराष्ट्रासह देशात आहे. सरकीचे भावही मोठ्या प्रमाणात वाढले असून, गाठींचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे लवकरच कापसाचे भाव सात ते साडेसात हजारावर जातील, असे भाकीत बाजार विश्लेषकांकडून केले जात आहे. 

लाभ कोणाला? 
सुरवातीला कापसाला सहा हजारापर्यंत भाव मिळाला यावेळी २५ टक्के शेतकऱ्यांनी कापूस विकला. मात्र, उर्वरित शेतकऱ्यांनी भाव वाढीच्या अपेक्षेने कापूस साठवून ठेवला होता. त्यानंतर मात्र दर घसरण सुरू झाल्याने, चार ते पाच हजार रुपये देऊन व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करून घेतला. आता मोजक्याच शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे. त्यामुळे आता भाववाढीचा लाभ शेतकऱ्यांना होणार की, व्यापाऱ्यांना हा चर्चेचा विषय बनला आहे. 

...तरीही उत्पादन तेवढेच 
गतवर्षी जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीच्या प्रादुभार्वामुळे ४० ते ४५ टक्के कापूस उत्पादन घटले होते. हाती आलेला कापूसही गुणवत्ता देऊ शकला नसल्याने, अल्पदरात शेतकऱ्यांनी तो विकून हात मोकळे केले. यंदा मात्र योग्य नियोजन, व्यवस्थापनातून शेतकऱ्यांनी बोंडअळीवर नियंत्रण मिळविले परंतु, पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादनाला मोठा फटका बसला असून, ५० टक्क्यांपर्यंत उत्पादनान घटीची शक्यता आहे.

Web Title: Good price to cotton at Akola