प्राणिसंग्रहालयातील जंगल खाक  

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

नागपूर - उन्हाचे चटके लागण्यास सुरुवात होताच गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात रविवारी सकाळी लागलेल्या आगीत दहा हेक्‍टर जंगल जळून खाक झाले. सकाळी दहा वाजता आग लागल्याची माहिती मिळताच गोरेवाड्यातील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मात्र, आगीचे स्वरूप अधिक तीव्र असल्याने सेमिनरी हिल्सचे कर्मचारी आणि मनपाच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर तब्बल चार तासांनी आग आटोक्‍यात आली. 

गोरेवाडा प्राणिसंग्रहालय १,९०० हेक्‍टर परिसरात असून यात रेस्क्‍यू सेंटर आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बिबट्याने येथून धूम ठोकली होती. तत्पूर्वी, एका बिबट्याने बंदिस्त हरणावर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. आता उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच दहा हेक्‍टर जंगल जळाल्याने गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या सुरक्षेबद्दल प्रशासनाबद्दल प्रश्‍नचिन्ह उभे ठाकले आहे. ही आग मानवनिर्मित असल्याचे वनाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

आग विझविण्यासाठी पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि लागलेली आग लक्षात घेता तातडीने त्यांनी सेमिनरी हिल्स येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे मदतीची हाक दिली. त्यांनी तातडीने वन कर्मचारी पाठविले. आग विझविण्याची प्रक्रिया सुरू केली. आग विझविण्यासाठी मनपाच्या अग्निशमन दलाच्या चमूलाही बोलविण्यात आले होते. मात्र, हायड्रंट पाइप लहान पडत असल्याने जवळच्या परिसरातील आग विझविली. कर्मचाऱ्यांना एअर ब्लोअरच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले. 

गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाला लागलेल्या आगीत दहा हेक्‍टर जंगल जळाले. ही आग मानवनिर्मित असून आग लागल्याची माहिती मिळताच तातडीने वन कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. मात्र, कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने आग विझविण्यास उशीर झाला. मदतीसाठी सेमिनरी हिल्सच्या कर्मचाऱ्यांकडे मदत मागितली. 
- सचिन रेपाळ , विभागीय वनाधिकारी, गोरेवाडा प्रकल्प

Web Title: Gorewal international zoos fire