गोसेखुर्द धरणात नाव उलटून मासेमार बुडाला

file photo
file photo

पवनी (जि. भंडारा) : तालुक्‍यातील गोसेखुर्द धरणात मासेमारी करताना अचानक झालेल्या वादळी पावसात नाव उलटली. या अपघातात मासेमार बुडाला असून अद्याप मृतदेह सापडला नाही. ही घटना रविवारी सायंकाळी पाथरी परिसरात घडली आहे.
पाथरी येथील पांडुरंग वकटू कांबळी (वय 55) रविवारी दुपारी चारच्या सुमारास मुलगा मच्छिंद्र कांबळी याच्यासोबत धरणात मासेमारी करीत होते. दरम्यान वादळी पाऊस सुरू झाला. वाऱ्याच्या वेगामुळे त्यांची नाव पाण्यात उलटली. मच्छिंद्र पोहत काठावर आला. परंतु, पांडुरंग यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची नोंद अड्याळ पोलिसांनी केली आहे. मात्र, अद्याप मासेमाराचा मृतदेह मिळाला नाही. पाथरी येथील ढिवर बांधव 10 डोंग्याद्वारे धरणात शोध घेत आहेत. गोसेखुर्द प्रकल्पबाधित पाथरी गावाचे पुनर्वसन चिचाळ गावाजवळ झाले आहे. पाथरी येथील बहुतेक ढिवर बांधव धरणात मासेमारी करून उपजीविका करतात. पांडुरंग कांबळी हा त्याच्या कुटुंबातील कर्ता पुरुष होता. तो बुडाल्यामुळे कुटुंबाचा आधार गेला आहे. या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
जनजागृतीची गरज
जिल्ह्यातील मासेमार पारंपरिक पद्धतीने नदी, तलाव व धरणात मासेमारी करतात. त्यासाठी जीवनरक्षक साहित्याचा वापर करत नसल्याने नैसर्गिक आपत्तीच्या घटनांत त्यांचा जीव धोक्‍यात येत असतो. या मासेमार बांधवांनी आपल्या व्यवसायात आधुनिक साहित्यांचा वापर करण्याची गरज असली; त्याबाबत त्यांना माहिती नसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com