सहा लाख गोवारींत एकच उच्चशिक्षित ‘डॉक्‍टर’

केवल जीवनतारे
शुक्रवार, 11 मे 2018

नागपूर - देशाच्या स्वातंत्र्याला सत्तर वर्षे झाली तरी अजूनही गायी राखून पोट भरण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. गायींना दररोज चरावयास घेऊन जाताना वाघाने तीन गुराख्यांचा जीव घेतला. अजूनही गोवर्धन पूजनाच्या दिवशी ‘गायगोधनाचा’ सण साजरा करतो. ढालपूजनापासून तर डफ, बासरी वाजवत गावातून सजविलेल्या गायींची मिरवणूक काढतोय... आमच्या लेकरायनं शिकायचं नाय काय? जो सत्तेवर येतो तो गोवारींच्या सांडलेल्या रक्ताचे भांडवल करतो, त्यांच्या भावनांशी खेळतो...सात लाख लोकसंख्येच्या गोवारी समाजात सत्तर वर्षांत ‘एम.

नागपूर - देशाच्या स्वातंत्र्याला सत्तर वर्षे झाली तरी अजूनही गायी राखून पोट भरण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. गायींना दररोज चरावयास घेऊन जाताना वाघाने तीन गुराख्यांचा जीव घेतला. अजूनही गोवर्धन पूजनाच्या दिवशी ‘गायगोधनाचा’ सण साजरा करतो. ढालपूजनापासून तर डफ, बासरी वाजवत गावातून सजविलेल्या गायींची मिरवणूक काढतोय... आमच्या लेकरायनं शिकायचं नाय काय? जो सत्तेवर येतो तो गोवारींच्या सांडलेल्या रक्ताचे भांडवल करतो, त्यांच्या भावनांशी खेळतो...सात लाख लोकसंख्येच्या गोवारी समाजात सत्तर वर्षांत ‘एम. डी.’ झालेला एकच डॉक्‍टर आहे...पाच-दहा इंजिनिअर, कलेक्‍टर तर शोधूनही सापडणार नाय...गोवारी शिक्षित होत आहे, परंतु स्पर्धेत टिकूच शकत नसल्याने त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे...ओबीसी अन्‌ विशेष प्रवर्गात असूनही गोवारी डॉक्‍टर का बनत नाही, हा हृदय हेलावून टाकणारा सवाल आहे गोवारी बांधवांचा.

केंद्रात सत्ता आल्यास गोवारी बांधवांना आदिवासींचा दर्जा देऊ, असे आश्‍वासन नागपूर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यापासून तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद गोवारींच्या भळभळणाऱ्या रक्तशिल्पासमोर दिले. केंद्रात आणि राज्यात आता भाजप सत्तेवर आहे. मात्र, गोवारींची मागणी अद्याप ना केंद्राच्या, ना राज्याच्या अजेंड्यावर आली. भाजपने गोवारी समाजाला ‘इमोशनल ब्लॅकमेल’ केले असून  गोवारी समाजाच्या मनात आता असंतोष खदखदत आहे. गोवारींच्या प्रश्‍नावर दै. सकाळने २१ जून २०१५ ला गोलमेज परिषद घेतली होती. त्यावेळी गोवारी समाजातील नेत्यांसह सर्व संघटनांनी अहवाल तयार करून शासनाला दिला. परंतु, तो अहवाल शासन दरबारी फाईलबंद आहे. 

स्मारक पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी 
२३ नोव्हेंबर १९९४ ला झीरो माइल चौकात गोवारींचे हक्कासाठी रक्त सांडले. ११४ गोवारी बांधव शहीद झाले. शहिदांच्या स्मरणार्थ सांडलेल्या रक्ताचे दगडी ‘रक्तशिल्प’ तयार झाले, मात्र गोवारी हक्कापासून वंचित राहिले. स्मारक केवळ साश्रूनयनांनी आदरांजली अर्पण करण्यासाठी उरले असल्याची भावना युवा गोवारींची असून समाजातील तरुण खऱ्या न्यायासाठी एकजुटीची वज्रमूठ उगारण्यासाठी सज्ज झाले आहेत.

ब्रिटिश अभ्यासक ‘फादर एलव्हीन’, रसेल व हिरालाल यांच्या संशोधनाच्या दाखल्यातून गोवारींचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध झाले आहे. काकासाहेब कालेलकर आयोगाने १९५६ ला गोवारी स्वतंत्र जमात असल्याची शिफारस केली. राज्य सरकारने १९८५ मध्ये अध्यादेश काढून गोवारींना हक्कांपासून दूर केले. केंद्रात ओबीसी आणि राज्यात विशेष मागास प्रर्वगात आरक्षण मिळाले. परंतु, गायी राखणारा समाज स्पर्धेत टिकू शकत नसल्याने अधिकारी बनण्यापासून समाज वंचित राहिला आहे. 
- योगेश नेहारे, युवा सामाजिक कार्यकर्ता, गोवारी समाज

अशा आहेत तरुणांच्या मागण्या...
अनुसूचित जमातीचा दर्जा द्या
गोवारी जमातीच्या विकासासाठी स्वतंत्र पॅकेज.
शहिदांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी.
बार्टीच्या धर्तीवर प्रशिक्षण देणारी योजना
दारिद्य्ररेषेखाली जीवन जगत असल्याने घरकुलासह रोजगाराच्या संधी 

Web Title: govari village doctor