शासकीय रक्तपेढी राज्यात अव्वल

यवतमाळ : रक्तदात्यांचा सत्कार करताना अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार.
यवतमाळ : रक्तदात्यांचा सत्कार करताना अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार.

सरकारी रक्तपेढी राज्यात अव्वल
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीत तब्बल 14 हजार चार बॉटल रक्त जमा करण्यात आले. त्यामुळे ही रक्तपेढी राज्यात अव्वल ठरली आहे. एका दिवसात जिल्ह्यात पाच; तर राज्यात सर्वांत मोठ्या दोन रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा शासकीय रक्तपेढी यवतमाळांतर्गत रक्तदात्यांचा सत्कार अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 8) येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आला. एका शिबिरात शिवसेनेतर्फे 800 बॉटल तर, साईसार्थ फाउंडेशनतर्फे 367 पिशवी रक्तसंकलन करण्यात आले. संघटनेतर्फे रवी शिंदे, विकास श्रीरसागर, भैरव भेंडे, नितीन कोल्हे यांनी सत्कार स्वीकारला. प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. भारती यांनी केले. रक्तदान शिबिर आयोजित करणाऱ्या सामाजिक संघटनांना शासकीय रक्तपेढीत संपर्क साधून रक्तदान शिबिर आयोजनाची तारीख घ्यावी लागत होती. आता ऑनलाइन शिबिराची नोंदणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वेबसाइटवर करता येणार आहे.
डिजिटल बोर्ड
रक्त मिळविण्यासाठी राजकीय नेत्यांचे फोन येतात. यात पारदर्शकता निर्माण व्हावी म्हणून शासकीय रक्तपेढीसमोर डिजिटल बोर्ड लवकरच लावण्यात येणार आहे. उपलब्ध रक्त कोणत्या गटाचे किती बॉटल आहे, याची माहिती यात राहणार आहे.

रक्तदात्यांमुळे राज्यात अव्वल येण्याचा बहुमान रक्तपेढीला मिळाला. रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात घेण्यात येते. मात्र, शिबिरास जाण्यासाठी शासकीय महाविद्यालयात व्हॅन नाही. अत्याधुनिक व्हॅनची गरज शासकीय महाविद्यालयास आहे. सुसज्ज अशी रक्तपेढी बनविण्याची आमची तयारी आहे.
- डॉ. मनीष श्रीगिरीवार, अधिष्ठाता, शासकीय रुग्णालय, यवतमाळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com