"नॅट' तंत्रज्ञानाशिवाय सरकारी रक्तपेढ्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

नागपूर : रक्तदानानंतर एका शरीरातील आजार दुसऱ्या शरीरात जाऊ नये म्हणून "नॅट' तंत्रज्ञान विकसित झाले. मेडिकल, मेयो, डागासह राज्यातील सर्वच रक्तपेढी या तंत्रज्ञानातून विकसित करण्यात येतील अशी घोषणा केली होती. परंतु, ही घोषणा हवेतच विरली. विशेष असे की, मेडिकलमधील रक्तपेढी "नॅट' तंत्रज्ञानातून विकसित करण्यासाठी केंद्र सरकारकडून 12 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, अद्यापही नॅटपासून मेडिकलची रक्तपेढी दूर असल्याची माहिती आहे. 

उपचारादरम्यान रुग्णांसाठी वापरात येणारे रक्त शुद्ध आहे की, नाही याची खात्री नॅट तंत्रज्ञानातून होईल. काविळीपासून तर एचआयव्हीपर्यंतचे गंभीर आजार रक्ताद्वारे पसरू नयेत म्हणून नॅट तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. रक्ताचे नमुने या तंत्रज्ञानातून विकसित केलेल्या यंत्रावर लोड केले जातात. काही वेळाने रक्तातील दोषांसहित गुणधर्म या चाचणीतून पुढे येतात. 
मेडिकलच्या रक्तपेढीत कधीकाळी अवघे पाच ते सात हजार रक्तपिशव्या गोळा होत असत. अलीकडे 15 हजार रक्तपिशव्या गोळा करण्याचा विक्रम मेडिकलच्या रक्तपेढीने नोंदवला. यामुळेच आदर्श रक्तपेढीचा दर्जा मेडिकलला मिळाला. त्यातच 
मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलच्या धर्तीवर मेडिकलमध्ये अद्ययावत मेट्रो ब्लड बॅंक लवकरच आकाराला येणार असेही सांगण्यात आले होते. नॅट तंत्रज्ञानाने जोडण्यासाठी दोन कोटींचा निधी मेडिकलच्या तिजोरीत जमा झाला आहे, असेही सांगण्यात आले होते. परंतु, चार वर्षे लोटून गेल्यानंतरही नॅट तंत्रज्ञान विकसाचा आराखडा कागदावरच आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government blood banks without "NAT" technology