हे सरकार दंगेखोरांचे : अॅड. प्रकाश आंबेडकर  

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

बुलडाणा : काही दिवसांपूर्वी जंतर मंतर येथे काही समाजकंटकांनी भारताचे संविधान फाडले होते, तसेच थोर नेत्यांबाबत अपशब्द वापरले होते, त्यामुळे 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली आहे, अशी पोस्ट भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होत होती. पण, असा कोणत्याही प्रकारचा बंद होणार नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच 'हे सरकार दंगेखोरांचे सरकार आहे' असाही आरोप आंबेडकर यांनी केला.      

सध्या सोशल मीडियाचा गैरवापर होत आहे, तर चांगल्याऐवजी वाईट गोष्टी पसरवण्यासाठी सोशल मीडिया वापरला जात आहे. मी कोणत्याही बंदची हाक दिलेली नसून सोशल मीडियावर केवळ अफवा पसरत आहेत. या खोट्या पोस्ट माझ्या नावाने पसरवल्या जात आहेत, मी अशी कोणतीही पोस्ट केलेली नसून हे सरकारच दंगेखोर आहे.

सर्व प्रयत्नाअंती कोणतेही दंगे होत नसल्याचे पाहून हा प्रकार ही त्यांच्याकडूनच झाला असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. तसेच जनतेने अशा पोस्टरासून सावध रहावे असेही त्यांनी सांगितले.    
          
Web Title: this government creates riots said prakash ambedkar