डॉक्‍टरांचे मानधन वाढविण्याचे आश्‍वासन सरकारने पाळले नाही 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

नागपूर : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुमारे दोन हजार प्रशिक्षित डॉक्‍टर (इंटर्नस्‌) अवघ्या सहा हजारांच्या मासिक मानधनावर सेवा देत आहेत. मानधन वाढविण्याचे आश्‍वासन सरकारने न पाळल्यामुळे राज्यात मेडिकल-मेयोसहित सर्वच प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर बुधवारी (ता. 13) आंदोलन पुकारले आहे. 

वैद्यकीय शिक्षण विभागाचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी 11 हजार रुपये मासिक मानधन वाढवून देण्याचे लेखी आश्‍वासन दिले होते. तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत 2012 मध्ये झालेल्या बैठकीत मानधन वाढीला हिरवी झेंडी दिली होती. परंतु, सत्ताबदल झाल्यामुळे ही मागणी रखडली. प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन दिले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेयो रुग्णालयात 18 मार्च 2018 रोजी मागणीचे निवेदन स्वीकारले. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात महिनाभरात बैठक घेण्याचे आश्‍वासन असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्नस्‌ (महाराष्ट्र) संस्थेच्या शिष्टमंडळाला दिले. परंतु, तीन महिने लोटूनही बैठक घेतली नाही.

इतर राज्यात मिळणारे मानधन (रुपयांत)

केरळ - 20 हजार 

दिल्ली - 19 हजार 

पश्‍चिम बंगाल -14 हजार 

आसाम - 12 हजार500 

गुजरात - 10 हजार 500

कर्नाटक - 8 हजार 500

तमिळनाडू - 8 हजार 500 
 
Web Title: The government has not fulfilled the assurances for doctors