शासकीय अनास्थेने उडाली मनोरुग्णांची झोप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

नागपूर - नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात मनोविकृतीशी संबंधित महत्त्वाची औषधे मिळत नसल्याने मनोरुग्णांचे हाल होत आहेत. औषधांसाठी रुग्णांच्या नातेवाइकांच्या हाती ‘प्रिस्क्रिप्शन’ दिले जाते. अनेक रुग्णांना गोळीशिवाय झोप येत नाही. परंतु, त्याही गोळ्या मिळत नाही. अशा प्रकारे शासकीय अनास्थेमुळे मनोरुग्णांची झोप उडाल्याचे चित्र आहे. 
प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात रोज किमान २५० मनोरुग्णांची नोंद होते. ६०० च्या वर रुग्ण विविध वॉर्डांमध्ये भरती आहेत.

यात ३०० पुरुष, तर ३०० महिला रुग्णांचा समावेश आहे. वॉर्डात भरती असलेल्या रुग्णांच्या नियमित तपासणीसाठी ते त्यांची स्वच्छता, समुपदेशन, भोजन व औषधोपचाराची व्यवस्था प्रशासनाला करावी लागते. सध्या हापकिनकडे औषधोपचार खरेदीचे अधिकार शासनाने दिले असल्याने आरोग्य विभागाचे खरेदी प्रक्रिया राबविण्यात हात बांधले. यामुळे कोणतीही औषधी खरेदी करता येत नाही.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार २०२० पर्यंत हृदयरोगानंतर नैराश्‍य हा मनोविकार दुसऱ्या क्रमांकावर असेल. वाढत्या तणावामुळे नैराश्‍यासारखे मनोविकार आगामी काळात वाढणार आहेत. बदलत्या काळानुसार मनोविकारांची कारणेही बदलली आहेत. नैराश्‍यासारख्या मनोविकारावर त्वरित उपचार होणे आवश्‍यक असते, अन्यथा आजाराची तीव्रता वाढत जाते. परंतु, नैराश्‍यावर आवश्‍यक औषध उपलब्ध नसल्याची माहिती पुढे आली आहे.

मनोरुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना मनोरुग्णांना हाताळणे कठीण झाले आहे. भरती मनोरुग्णांना वेळेत औषध न मिळाल्याने ते हिंसक होतात. यामुळे कक्ष परिचरांचाच जीव धोक्‍यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.

उपलब्ध नसलेली औषधे
मनोरुग्णालयात येणाऱ्या मनोरुग्णांवरील उपचारासाठी १० प्रकारची औषधे उपलब्ध असतात. मात्र, सध्या केवळ एकाच प्रकारचे औषध उपलब्ध आहे. ‘डायझेपॅम’, ‘क्‍लोनाझेपॅम’, ‘लोराझेपॅन’ तसेच झोपेच्या गोळ्यांसहित नैराश्‍यावरील औषध येथे उपलब्ध नाही. औषधोपचाराची मागणी आरोग्य उपसंचालक कार्यालयात केली जाते. अशा प्रकारे मनोरुग्णालयात औषधांचा मेंटल ब्लॉक तयार झाला आहे. अधिकाऱ्यांशी औषधांच्या उपलब्धतेसंदर्भात विचारणा केली असता, त्यांनीदेखील चुप्पी साधली.

सहसंचालकांचा मोबाईल खणखणतोय
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाशी संबंधित सहसंचालक डॉ. साधना तायडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल नुसता खणखणत होता. विशेष असे की, त्या फोन कधीच उचलत नाहीत.

Web Title: government hospital patient medicine