"शेतकरी सन्मान'साठी सरकारची लगीनघाई! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार देण्यासाठी "शेतकरी सन्मान' सुरू केली. मात्र, निवडणुकीपूर्वीच याचा लाभ पोहोचावा याकरिता सरकारने आवश्‍यक कागदपत्रे आणि अटी निश्‍चित न करताच योजनेची अंमलबजावणी सुरू केली. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडत आहे. महिन्याभरात निम्म्याही शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील लाभ मिळाला नाही. आता नव्याने काही सुधारित सूचना देण्यात आल्या आहेत. 

नागपूर - शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार देण्यासाठी "शेतकरी सन्मान' सुरू केली. मात्र, निवडणुकीपूर्वीच याचा लाभ पोहोचावा याकरिता सरकारने आवश्‍यक कागदपत्रे आणि अटी निश्‍चित न करताच योजनेची अंमलबजावणी सुरू केली. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडत आहे. महिन्याभरात निम्म्याही शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील लाभ मिळाला नाही. आता नव्याने काही सुधारित सूचना देण्यात आल्या आहेत. 

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरू केली. या योजनेअंतर्गत दोन हेक्‍टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहेत. ही रक्कम तीन टप्प्यांत मिळले. प्रत्येक टप्प्यात दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत. शुभारंभ झाला त्याच दिवशी काहींना मिळालेली रक्कम परत घेण्यात आल्याचे समोर आले. या योजनेच्या लाभासाठी आधार क्रमांक किंवा पॅन कार्डची प्रत घेण्यात आली. नागपूर जिल्ह्यात 1 लाख 11 हजार शेतकऱ्यांनी अर्ज केला. त्यांनी आवश्‍यक कागदपत्रेही दिली. मात्र, आधार क्रमांक असलेले नाव आणि बॅंक खात्यात असलेले नाव यात किरकोळ तफावत असल्याने हजारो लाभार्थ्यांचे अर्ज परत आले. ज्या शेतकऱ्यांनी पॅन कार्डची प्रत जोडली, त्यांचेही अर्ज परत पाठविण्यात आले. आता केंद्र सरकारने फक्त आधार नंबर आवश्‍यक केले. त्याचप्रमाणे नवीन सूचनाही दिल्या आहेत. यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडत आहे. यातच तलाठ्यांकडून शेतकऱ्यांना योग्यरीत्या मार्गदर्शन करण्यास टाळाटाळ होत आहे. अर्जातील त्रुटीही त्यांच्याकडून दूर करण्यात आली नाही. एका तलाठ्याने त्रुटी दूर करून अर्ज तालुक्‍याच्या ठिकाणी पाठविण्यात आल्याचे सांगितले. तालुक्‍यातील कर्मचाऱ्याने अर्ज महाऑनलाइकडे वर्ग केल्याचे सांगिलते. मात्र, महाऑनलाइकडे अर्ज पाठविण्याची गरज नसून ऑनलाइन अर्ज भरायचे असल्याचे सांगितले. या कर्मचाऱ्यांकडूनही अर्ज इकडून तिकडे फिरविण्यात येत आहे. 

Web Title: Government in a hurry to honor farmers