शासनाची दूध दरवाढ; ‘मदर’ची खरेदी जुन्याच दराने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दरवाढीचे अांदोलन केल्यानंतर  शासनाने पाच रुपये दरवाढ घोषीत केली. याची एक अाॅगस्टपासून अंमलबजावणी केली जात असून बुलडाणा जिल्हयात मदर डेअरीकडून मात्र जुनेच दर मिळत असल्याची अोरड दूध दुत्पादकांमध्ये सुरु झाली अाहे. मदर डेअरीकडून बुलडाणा जिल्ह्यात १२ हजार लिटरपेक्षा अधिक दूधाचे संकलन होत अाहे. दर लीटर पाच रुपये प्रमाणे दिवसाला हजारों रूपयांचे नुकसान होत आहे.

जिल्ह्यात मोताळा, नांदुरा, मलकापूर या तालुक्यांमध्ये ‘मदर’ डेअरीचे अधिक संकलन अाहे. डेअरीकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे दिले जातात. शासनाने नुकतीच दूध दरवाढ केली असून त्याची अंमलबजावणी करण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत. मात्र मदर डेअरीकडून अद्याप या दरवाढीची अंमलबजावणी केली जात नसल्याने दूध उत्पादक प्रश्नचिन्ह उपस्थित करीत अाहेत. या जिल्ह्यात इतर डेअरींकडूनही हजारो लिटर दूध खरेदी केले जाते मात्र त्यांच्याकडून अाधीच चांगले दर दिले जात अाहेत. केवळ मदर डेअरीचा दर हा फॅट ३.५ (SNF ८.४) साठी २१ रुपये ७० पैसे इतका दिला जात आहे. परिणामी हजारो दूध उत्पादक शेतकरी शासनाने केलेल्या भाववाढीपासून दूरच असल्याची बाबही यानिमित्ताने पुढे अाली अाहे.   

दूध उत्पादन करणे कठीण झाल्याने शासनाने दरवाढ करावी अशी मागणी उत्पादकांमधून सातत्याने होत होती. त्याला न्याय मिळाला असून पाच रुपये प्रतिलीटर दरवाढ जाहीर झाले अाहेत. हे दर जाहीर करीत अंमलबजावणीचे अादेश देण्यात अाले.

पत्राची प्रतिक्षा
मदर डेअरीकडून सुधारीत दर न देण्याबाबत चौकशी केली असता, अद्याप अधिकृत पत्र मिळाले नसल्याचे सांगण्यात अाले. शासनाने दरवाढ देण्याबाबत जो अादेश दिला त्यात काही अटी असून त्यांची तपासणी करून नंतरच त्याबाबत दरवाढीचा निर्णय डेअरीच्या वरिष्ठ स्तरावरून घेतला जाईल, असे सांगण्यात अाले. या डेअरीचे दर हे वरिष्ठपातळीवर ठरविले जातात. स्थानिक स्तरावर काम करणाऱ्यांना त्याबाबत कुठहीली अधिकृत माहिती देता येत नाही, असेही संबंधितांनी नाव प्रसिद्ध न  करण्याच्या अटीवर माहिती दिली. 

Web Title: government increase in milk price but mother deary sold in old price