डिफेंस ः केंद्र सरकारच्या विरोधात कुटूंबासह एकत्र येउन नारेबाजी करताना आयुध निर्माणीचे कर्मचारी.
डिफेंस ः केंद्र सरकारच्या विरोधात कुटूंबासह एकत्र येउन नारेबाजी करताना आयुध निर्माणीचे कर्मचारी.

आयुधनिर्माणीच्या कर्मचा-यांचा आक्रोश

वाडी/सोनेगाव (जि.नागपूर) : आयुध निर्माणीच्या प्रस्तावित निगमीकरण व खासगीकरण धोरणाचा तीव्र निषेध करीत केंद्रातील आयुध निर्माणी अंबाझरीच्या कर्मचा-यांनी मोठया संख्येने एकत्रित येऊन परिवारासह मोर्चा काढला व मोदी सरकारच्याविरोधात नारेबाजी केली. केंद्राच्या या निर्णयाच्या विरोधात मागील एक महिन्यांपासून रेड युनियन, बीएमएस, इंटक, लोकशाही कामगार या चार फेडरेशनचे कर्मचारी एका मंचावर येऊन मोदी सरकारच्या निगमीकरण धोरणाविरोधात आंदोलन करीत आहेत. शनिवारी सायंकाळी आयुध निर्माणी अंबाझरीचे कर्मचारी, त्यांच्या पत्नी, लहान मुलांसह दत्तवाडी डिफेन्स प्रवेशद्वारासमोर हातात बॅनर, निषेध असणारे फलक घेऊन एकत्रित आले. तीन हजारापेंक्षा अधिक संख्येने या आंदोलनात चारही कामगार संघटनांचे नेते ऑर्डनेंस एम्प्लॉयीज यूनियन (लाल झेंडा) अध्यक्ष गिरीश खाडे, बी.बी. मजूमदार, विनोद कुमार, आशीष पाचघरे, दीपक गावंडे, क्षीरसागर, विनोद रामटेके, राकेश खाडे, इंटकचे प्रवीण महल्ले, सुभाष पडोळे, अरविंद सिंह, अंजुम, बी.पी.एम.एसचे राष्ट्रीय महामंत्री आर.पी.चवरे, अध्यक्ष बंडू तिड़के, ओ.पी.उपाध्याय, ब्रिजेश सिंह, संजय वानखेड़े, अतुल चवरे, लोकशाही कामगार यूनियनचे अध्यक्ष जगदीश गजभिये, वेदप्रकाश सिंह, अविनाश रंगारी, सुदर्शन मेश्राम, सतीश बागडे, खुर्शीद पठाण, अबनिश मिश्रा, प्रेमसागर आदींनी जोरदार निषेध केला. डिफेन्स दत्तवाडी प्रवेशद्वारावर परत येऊन जाहीर सभा घेण्यात आली. फॅक्‍ट्री स्थापनेच्या 55 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कर्मचारी व त्यांचे कुटूंबिय रस्त्यावर उतरले होते. संतप्त महिलांनी सरकारच्या विरोधात नारेबाजी केली. जाहीर सभेत सर्व नेत्यांनी मोदी सरकारच्या या देशविघातक निर्णयाच्या विरोधात संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय रद्द झाला नाही तर येत्या निवडणुकीत भाजपला धडा शिकविणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. 20 ऑगस्टपासून देशभरातील 41 आयुध निर्माणीत 30 दिवस शस्त्र उत्पादन बंद करून आंदोलन यशस्वी करण्याचा निर्णय व्यक्त करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com