शासनाला कोट्यवधींचा फटका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

नागपूर : महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे आज दुसऱ्या दिवशीही जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज ठप्प राहिले. यामुळे शासनाला कोट्यवधींचा फटका बसल्याचे सांगण्यात येते.

नागपूर : महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे आज दुसऱ्या दिवशीही जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज ठप्प राहिले. यामुळे शासनाला कोट्यवधींचा फटका बसल्याचे सांगण्यात येते.
महसूल कर्मचाऱ्यांच्या शासनाकडे प्रलंबित मागण्यांसंदर्भात कर्मचाऱ्यांकडून अनेकदा निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, यानंतरही शासन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामबंद व लेखणीबंद आंदोलनाचा पवित्र अवलंबिला आहे. बुधवारी सामूहिक रजा आंदोलनानंतर आज गुरुवारी कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलनास सुरुवात केली. त्यामुळे कर्मचारी कार्यालयात हजर असतानादेखील कुठलीही कामे झाली नाही. यामुळे सामान्य नागरिकांना आल्या पावली परत जावे लागल्याचे चित्र आज जिल्हाधिकारी कार्यालयासह तालुकास्तरावरील तहसील कार्यालयांमध्ये पाहायला मिळाले. नागपूर जिल्हा महसूल तृतीयश्रेणी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र ढोमणे यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या शासनाने मान्य करायला हव्यात. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह तालुकास्तराव तहसील कार्यालय आदी ठिकाणी या आंदोलनाचा फटका सामान्य नागरिकांना बसून शासनाचा जवळपास कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याचे त्यांनी सांगितले. खनिकर्म विभागातील कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग नोंदविल्यामुळे शासनाच्या महसुलावर चांगलाच फटका बसला आहे. उद्या, शुक्रवारी 12 जुलै रोजीही लेखणीबंद आंदोलन व 15 जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलनास सुरुवात करण्यात येणार असल्याचेही ढोमणे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The government shocked due to the work closing