शासकीय वाहनाची दुचाकीला जबर धडक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

सावनेर  (जि.नागपूर) : शासकीय वाहनाच्या चालकाने वाहन निष्काळजीपणे भरधाव चालवीत दुचाकीला मागून जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार वाहनासह रस्त्याच्या शेतातील कुंपणात फेकला गेला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी दुपारी 2:30च्या दरम्यान माळेगाव शिवारात नागपूर-सावनेर मार्गावर घडली. अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव मनीष चुडामण पाटील (वय 39, गायकी ले-आउट, सावनेर) असे आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार एमएच 40 एझेड 0733 क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने मनीष सावनेरकडे येत असताना मागून नागपूरमार्गे भरधाव येणाऱ्या एमएच 31 एफए 8409 क्रमांकाच्या शासनाच्या चारचाकी वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीसह मनीष रस्त्याच्या शेजारी असलेल्या शेताच्या कुंपणात फेकला गेला. या अपघातात त्याच्या डोक्‍यावर गंभीर मार लागून तो जखमी झाला. तर, चारचाकी वाहन झाडावर आढळून शेतात जाऊन थांबले. जखमी मनीषला उपचारादरम्यान नागपूर येथील रुग्णालयात भरती केल्याचे व शासकीय वाहन निष्काळजीपणे भरधाव चालविणाऱ्या चालकाचे नाव नीलेश थुगावकर असल्याचे कळते. खापरखेडा वारेगाव परिसरात निवडणुकीच्या कामासाठी वाहन वापरात असल्याची चर्चा आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government vehicle bicycles collide