राज्यकर्त्यांना फक्त खुर्ची हवीय - श्रीपाल सबनीस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

लातूर- ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने आयोजित सोहळ्यात विलास माने यांच्या 'कत्ती' या आत्मकथनाचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. यावेळी 'ही अंधश्रद्धा आहे', 'हे अज्ञान आहे', असे आता कोणी सांगणार नाही. कारण देवेंद्र फडणवीस, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह हल्लीच्या सर्वच राज्यकर्त्यांना फक्त आणि फक्त खुर्ची हवी आहे, तर आमच्यासारख्या लेखक-विचारवंतांना हारतुरे. मग प्रबोधनाचं काम कोण करणार आहे", असा सवाल माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी उपस्थित केला. समाजाचे आजचे चित्र बदलायचे असेल तर विवेकशील बुद्धी एकत्र आणायला हवी, असेही ते म्हणाले.

या वेळी साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे, प्रा. नागोराव कुंभार, लक्ष्मण माने, कवी फ. म. शहाजिंदे, प्रा. मधुकर सलगरे, माजी आमदार माणिकराव जाधव, भगवान इंगळे, प्रकाशक सुरेश हिंगलासपुरकर उपस्थित होते

डॉ. सबनीस म्हणाले, "इतक्या वर्षानंतरही भटके विमुक्त दारिद्र्यात आहेत. अनेकांना अन्न, पाणी, आरोग्य, हक्क यापासून दूर राहावे लागत आहे. तर मग आजवरच्या सरकारने, संस्कृतीच्या ठेकेदाऱ्यांनी, विचारवंत-तत्वज्ञांनी, धर्म मार्तंडांनी काय केले? समाजाचा सर्वांगिण विकास का झाला नाही? स्वातंत्र्याचा सूर्य कोणाच्या तिजोरीत बंद होता? त्यामुळेच विकास तळागाळात पोचला नाही. हे चित्र बदलायला हवे."

सरकार संवेदनशील नाही
कत्ती ही आत्मकथा नव्हे तर 'यातनाकथा' आहे. यात विद्रोह आहे. मानवजातीचे दुःख आहे. या कथा अंतर्मुख करतात, असे डॉ. जनार्दन वाघमारे यांनी सांगितले. 'स्वातंत्र्याचे झाले काय, आमच्याकडे आलेच नाय', असे पूर्वी म्हटले जायचे. ते चित्र आजही समाजात आहे. समाजातील गुलामगिरी तशीच आहे. असे प्रश्न सुटावेत. पण सरकारमधील आजची माणसे संवेदनशील नाहीत, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.
 
Web Title: Governors want only a chair - Shripal Sabnis