थेट लढतीत टक्केवारीवरच अधिक लक्ष

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

पदवीधर मतदारसंघात दहा हजार मतदार करणार आज मतदान 

अमरावती - विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील प्रतिनिधीसाठी शुक्रवारी (ता. ३) मतदान होत आहे. पाच जिल्ह्यातील ५६ तालुक्‍यांतून २ लाख १० हजार ५१७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावून प्रतिनिधींची निवड करतील. रिंगणात तेरा उमेदवार असले तरी या मतदारसंघात थेट लढतीचे चित्र असून भाजपचे डॉ. रणजित पाटील व काँग्रेसचे संजय खोडके यांच्यातच खरी लढत होईल असे मानले जात आहे. असे असले तरी प्रहारचे डॉ. दीपक धोटे व अपक्ष उमेदवार डॉ. अविनाश चौधरीसुद्धा काही ठिकाणी जोर मारण्याची शक्‍यता आहे.

पदवीधर मतदारसंघातील निवडणूक पक्षीय वळणावर आल्याने त्याला सार्वत्रिक स्वरूप प्राप्त झाले आहे. सहावेळा विधान परिषदेत नेतृत्व करणाऱ्या नुटा संघटनेने स्वतःला या निवडणुकीतून दूर ठेवल्याने व स्वविवेकाने मतदानाचे आव्हान केल्याने पक्षीय मतांवर निवडणूक अधिक विसंबली आहे. रिंगणात एकूण तेरा उमेदवार असले तरी थेट लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. 

प्रहारचे प्रा. दीपक धोटे व अपक्ष उमेदवार डॉ. अविनाश चौधरी हे मत विभाजन करून कुणाला किती नुकसान पोहोचवतात हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.

प्रशासनाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून मतपत्रिकेवर उमेदवाराचे छायाचित्र राहणार आहे. या मतदारसंघात आजवरची सर्वाधिक २ लाख १० हजार ५११ मतदारांची नोंदणी झाली असून सार्वधिक ७६ हजार ६७१ मतदार अमरावती जिल्ह्यातील आहेत. या मतांवर सर्वच उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे. मोठ्या संख्येने मतदार नोंदणी झाली असून त्याचा लाभ कुणाला मिळतो याची उत्सुकता ताणल्या गेली आहे. अशातच मतदान किती टक्के होते यावरही बरेच चित्र अवलंबून आहे. 

या मतदारसंघात ५५ ते ६० टक्‍क्‍यांच्या जवळपास मतदान झाले आहे.  शुक्रवारी (ता. २) सकाळी आठपासून ५६ तालुक्‍यांतील २८० मतदान केंद्रांवर मतदानास प्रारंभ होणार आहे. सायंकाळी ४ पर्यंत मतदान करता येणार आहे. मतमोजणी सोमवारी ६ फेब्रुवारीला होईल.

Web Title: graduate constituency election voting