गडचिरोली जिल्ह्यात पदवीधरच्या मतदानात दुपटीने वाढ

Graduate turnout in Gadchiroli district has doubled
Graduate turnout in Gadchiroli district has doubled

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक 2020 मध्ये गडचिरोली जिल्ह्याचे मतदान 72.37 टक्‍के झाले. मागील पदवीधर निवडणूक 2014 च्या 35.86 टक्‍क्‍यांमध्ये 36.51 टक्‍के म्हणजे दुपटीने वाढ नोंदविली गेली आहे.
 
जिल्ह्यातील एकूण 12,448 मतदारांपैकी 9008 मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले. यामध्ये केलेल्या मतदानात पुरुष मतदार 6751 तर महिला मतदार 2257 अशी आकडेवारी आहे. जिल्ह्यात सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 21 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 19 उमेदवार नागपूर विभागातून निवडणुकीसाठी उभे आहेत. या मतदानाची मतमोजणी नागपूर येथे 3 डिसेंबर रोजी केली जाणार आहे.

जिल्ह्यात तालुकानिहाय यात गडचिरोली तालुक्‍यात 3335 मतदारांपैकी 2303 मतदारांनी (69.05 टक्‍के) मतदान केले, अहेरी 840 मतदारांपैकी 649 मतदारांनी (77.26 टक्‍के) मतदान केले, आरमोरी 1681 मतदारांपैकी 1246 मतदारांनी (74.12 टक्‍के) मतदान केले, भामरागड 135 मतदारांपैकी 108 मतदारांनी (80.00 टक्‍के) मतदान केले, चामोर्शी 1718 मतदारांपैकी 1168 मतदारांनी (67.98 टक्‍के) मतदान केले, धानोरा 423 मतदारांपैकी 323 मतदारांनी (76.36 टक्‍के) मतदान केले, एटापल्ली 392 मतदारांपैकी 250 मतदारांनी (63.78 टक्‍के) मतदान केले, कोरची 453 मतदारांपैकी 335 मतदारांनी (73.95 टक्‍के) मतदान केले, कुरखेडा 1051 मतदारांपैकी 880 मतदारांनी (83.72 टक्‍के) मतदान केले, मुलचेरा 441 मतदारांपैकी 358 मतदारांनी (81.18 टक्‍के) मतदान केले, सिरोंचा 426 मतदारांपैकी 288 मतदारांनी (67.61 टक्‍के) मतदान केले व देसाईगंज 1409 मतदारांपैकी 1100 मतदारांनी (78.06 टक्‍के) मतदान केले. यामध्ये संख्यात्मक मतदानात गडचिरोली तालुक्‍यात सर्वांत जास्त 2303 मतदारांनी सहभाग नोंदविला.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com