akola
akola

World Consumer Day : फसवणूक करणाऱ्या 417 जणांना ग्राहक मंचाचा दणका 

अकोला : ग्रामीणसह शहरी भागातील जनतेची फसवणूक झाल्यानंतर त्यांना न्याय मिळत नव्हता. त्यामुळे नागरिकांना आपल्या हक्कासाठी ग्राहक मंचाचा दरवाजा ठोठावता यावा म्हणून जिल्हा ग्राहक तक्रार मंचाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर फसवणूक झालेल्या ग्राहकांचा अकोला जिल्हा ग्राहक मंचात निपटारा होत आहे. जानेवारी 2018 पासून ते फेब्रुवारी 2019 पर्यंत ग्राहक मंचाकडे 495 प्रकरणे दाखल करण्यात आली असून, त्यापैकी ग्राहक मंचाने 417 जणांना दणका दिला आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्यास ग्राहकांना सोयीस्कर होत आहे.

ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकीला आळा बसावा, यासाठी अकोला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाची स्थापना करण्यात आली. जिल्हा ग्राहक निवारण मंचात शहर व ग्रामीण परिसरातील ग्राहकांना दाद मागता येते. बिल्डर, विमा कंपन्या, बँक, वैद्यकीय, दूरध्वनी, वीज वितरण, शिक्षण, विमानसेवा, रेल्वे यासारख्या विविध सेवांमध्ये झालेल्या फसवणुकीच्या विरोधात ग्राहक मंचात तक्रार करता येते.

थोडक्यात ग्राहकाला फसवणूक केलेल्या कंपनीला ग्राहक मंचाद्वारे नुकसान भरपाईची मागणी करता येते. मंचात दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर निकाल दिला जातो. त्यामध्ये ग्राहकाच्या बाजूने निकाल लागल्यानंतर आदेशाची विहित मुदतीत पूर्तता होणे आवश्यक असते. मात्र, विहित मुदतीत आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास ग्राहकाला कायद्याच्या कलम 25 नुसार कारवाई करण्यासंदर्भात ग्राहक मंचाकडे अर्ज करावा लागतो. असे अर्ज आल्यानंतर ग्राहक मंच जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित कंपनीच्या विरोधात मालमत्ता जप्त करून तक्रारदारांची रक्कम वसूल करण्याचा आदेश देतो. ही वसुली जिल्हाधिकारी तहसीलदारांमार्फत करत असतात. वसूली प्रमाणपत्र पाठवून रक्कम वसुल करण्याचे निर्देश ग्राहक मंचाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये देण्यात आले आहेत. जानेवारी 2018 पासून फेब्रुवारी 2019 पर्यंत अकोला जिल्हा ग्राहक मंचात 495 तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत.

तर या तक्रारींमध्ये 417 प्रकरणे ग्राहक मंचाने निकाली काढली आहे. यामध्ये ग्राहकाची फसवणूक केलेल्या कंपनीला ग्राहक मंचाद्वारे नुकसान भरपाईचे आदेश देण्यात आले आहे. तर बरेच प्रकरणे तडजोडीने सुटल्याचे देखील सांगण्यात येत आहे. तसेच विविध वाद विवादानंतर शासनाने परिपत्रक काढून ग्राहक मंचाचे कामकाज मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीनही भाषेतून चालावे असे आदेशित केले आहे. त्यामुळे जिल्हा ग्राहक निवारण मंचाकडे तक्रार अर्ज दाखल करण्यापासून ते निकालापर्यंत सर्व टप्यातील कामकाज तीनही भाषेत चालत आहे. ग्राहक मंचामुळे अनेकांना दिलासा मिळाला असून, फसवणूक करणाच्या कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्यास सोयीस्कर झाले आहे.

17 प्रकरणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे
अकोला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात जून 1, जुलै 2, आॅगस्ट 2, सप्टेंबर 1, नोव्हेंबर 2018 मध्ये 11 प्रकरणात आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने या तक्रारी कलम 25 नुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या आहेत.

अंमलबजावणी न झालेली प्रकरणे मंचाकडेच
मंचाच्या आदेशाची अंमलबजावणी न झालेली 135 प्रकरणे ग्राहक मंचाकडे परत आली. त्यापैकी 115 प्रकरणात तडजोडीने निपटारा करण्यात आला आहे. तर 20 प्रकरणे थंडबस्त्यात आहे.

ग्राहकाच्या बाजूने निकाल देण्याचा प्रयत्न
ग्राहक न्यायालयाच्या वतीने 75 टक्के प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. यामध्ये जास्तीत जास्त प्रकरणात ग्राहकाच्या बाजूने निकाल देण्याचा प्रयत्न केला आले.
एस. एम. उंटवाले, अध्यक्ष, जिल्हा ग्राहक न्यायालय, अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com