पोलिसांना मिळाली टीप आणि चोरटे झाले गजाआड

chor.
chor.

यवतमाळ : सोने-नाणे; वस्तू, गाड्या-घोड्या रुपये-पैसे या वस्तुंची चोरी होते, हे खरे आहे; मात्र चोरट्यांनी चक्क शेतमालाचीच चोरी केली आणि एवढेच नाही तर ते तो माल घेऊन विकायला बाजारात आले. मात्र पोलिसांना याची टीप मिळाली आणि चोरांचे मनसुबे यशत्वी झाले नाही.

चोरी केलेले सोयाबीन, तूर, चना धान्य घेवून विक्रीसाठी यवतमाळातील टांगा चौकात आलेल्या टोळीला पोलिसांनी अलगद गजाआड केले. ही कारवाई गुरुवारी (ता.२४) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या चोरट्यांचे थोडेथोडके नव्हे तर तब्बल २४ गुन्हे उघडकीस आले आहेत.

सय्यद जुबेर सय्यद ताहेर (रा. आर्णी), लल्ला उर्फ ललित चव्हाण (रा. दिग्रस) हे दोघे धान्यविक्रीसाठी यवतमाळात आल्याची टीप पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. विश्‍वासात घेवून विचारपूस केली असता चोरट्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली.

सय्यद मुबारक सय्यद मुजफ्फर (रा. दारव्हा), शेख समीर शेख रहीम यांच्यासह मिळून आर्णी, दिग्रस, दारव्हा, पारवा, लाडखेड परिसरात किराणा दुकान, गोदाम फोडले. त्यातून अन्नधान्य, किराणा साहित्याची चोरी केल्याची कबुली दिली. सय्यद मुबारक, शेख समीर यांना दारव्हा येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आर्णी येथील १२, दिग्रस येथील पाच, दारव्हा येथील चार, पारवा येथील दोन लाडखेड येथील एक असे एकूण २४ गुन्हे उघडकीस आणले.

चोरट्यांकडून पाच लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलिस अधीक्षक नुरूल हसन, पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सचिन पवार, विशाल भगत, सुरेंद्र वाकोडे, मो. जुनेद, सुधीर पिदुरकर, यशवंत जाधव आदींनी केली.
संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com