ग्रामपंचायतीची इमारत "रस्त्या'वर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

पारशिवनी (जि. नागपूर) :  तालुक्‍यातील गवणा गराडा गावात ग्रामपंचायतीच्या इमारतीचे काम रस्त्यावर व शेतीच्या जागेवर करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दुसरीकडे इमारतीचे बांधकाम योग्य ठिकाणी होत असल्याचा दावा ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव यांनी केला आहे. ग्रामपंचायतीची इमारत बायबास मार्गावर होत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी शासकीय निधीचा वापर करण्यात येत आहे. ही इमारत गावकऱ्याच्या अडचणीत भर टाकणार असल्याचे मत गावकऱ्यांनी केला असून काम बंद करून योग्य जागेवर बांधकाम करण्याची मागणी केली आहे. बांधकामासाठी 12 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. साधारण 25 वर्षांपूवी शासनाने गवणा बायपास मार्गाकरिता ही जागा विकत घेतली होती, मार्गाच्या दोन्ही बाजूस 40 फूट जागा ही राखीव ठेवण्यात आली. कालांतराने ही जागा जिल्हा परिषदकडे वर्ग करण्यात आली. त्यामुळे या मार्गाला जिल्हा व इतर मार्गाचे स्वरूप आले. काही दिवसापूर्वी याच रस्त्यावर ग्रामपंचायत इमारत बांधकाम होत असल्याने वळण मार्गावर अनेक समस्या निर्माण होणार असल्याचे मत गावकरी व्यक्त करीत आहेत. बांधकामासाठी गवणा-गरडा ग्रामपंचायतने ठराव घेतला आहे. याची तक्रार केल्यावर बांधकामाला गती आली आहे. यामुळे नागरिकांत रोष निर्माण झाला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat building on the road