ग्रामपंचायतीचे 17 लाख हडपले

file photo
file photo

वणी (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील अहेरी येथील ग्रामपंचायतीच्या बॅंक खात्यातून बनावट स्वाक्षरी करून 17 लाख रुपये हडप करणाऱ्या दोन संशयित आरोपींना येथील न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक देवराव गोधाडे यांना शासकीय कामात मदत करणारा निवली येथील प्रशांत बोढे याने अहेरी ग्रामपंचायचे चेकबुक मिळविले. ग्रामपंचायतीचे खाते असलेल्या ऍक्‍सिस, आयडीबीआय व यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील खात्यातून मित्रांच्या साहाय्याने 14वा वित्त आयोग, सामान्य निधी व पाणीपुरवठा निधीचे 17 लाख 69 हजार रुपये लंपास केले. याबाबतची माहिती ग्रामसेवक यांना उशिरा कळली. दरम्यान, गुरुवारी (ता.22) लंकेश नरुले हा 57,083 रुपयांचा धनादेश घेऊन ऍक्‍सिस बॅंकेत पैसे काढण्यासाठी गेला होता. त्यामुळे त्याचे बिंग फुटले. पैसे काढण्यासाठी त्यांनी सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांची बनावट स्वाक्षरी व शिक्‍क्‍यांचा उपयोग केला. लंकेशने हा धनादेश प्रशांत बोढे यांनी पैसे काढण्यासाठी दिला असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मार्च महिन्यापासून खात्यातून तीन ते चार मित्रांच्या नावाने रक्कम काढण्यात आली. सध्या पोलिसांनी संशयित प्रशांत बोढे व लंकेश नरुले यांना अटक करून येथील न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना येत्या 26 ऑगस्टपर्यंत म्हणजे चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात अन्य काही संशयितांवर कारवाई होण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com