सर्वच पक्षांचे "नंबर वन'चे दावे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

नागपूर : जिल्ह्यातील 382 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले असून सर्वच पक्षांच्या नेत्यांनी विजयाच्या केलेल्या दाव्यांची आकडेवारींची बेरीज केल्यास त्यांची संख्या सहाशेच्या घरात जाते. यामुळे कोणत्या पक्षाने नेमक्‍या किती ग्रामपंचायती जिंकल्या याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

नागपूर : जिल्ह्यातील 382 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले असून सर्वच पक्षांच्या नेत्यांनी विजयाच्या केलेल्या दाव्यांची आकडेवारींची बेरीज केल्यास त्यांची संख्या सहाशेच्या घरात जाते. यामुळे कोणत्या पक्षाने नेमक्‍या किती ग्रामपंचायती जिंकल्या याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
भाजपने तब्बल 218, कॉंग्रेसने 180, शिवसेनेने 97 तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने 148 सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे. सावनेर तालुक्‍यात 27 पैकी कॉंग्रेसचे 19, भाजपचे 6 समर्थित सरपंच निवडून आले आहेत. कळमेश्‍वर तालुक्‍यात कॉंग्रेस समर्थित 15 तर भाजप समर्थित 6 सरपंच विजयी झाले आहेत. रामटेक तालुक्‍यात 29 पैकी 12 कॉंग्रेस समर्थित सरपंच निवडून आले आहेत. शिवसेना 11 व भाजपचे 4 सरपंच निवडून आले आहेत. पारशिवनी तालुक्‍यात 19 पैकी 6 जागांवर कॉंग्रेस समर्थित सरपंच निवडून आले आहेत.
भाजपचे 5 व शिवसेनेचे 4 सरपंच निवडून आले आहेत. उमरेड तालुक्‍यात कॉंग्रेस समर्थित 8 व भाजप समर्थित 6 सरपंच निवडून आले. 11 सरपंच स्वतंत्र आहेत. भिवापूर तालुक्‍यात कॉंग्रेस व भाजप समर्थित 17-17 सरपंच विजयी झाले. कुही तालुक्‍यात भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस समर्थित 3-3 सरपंच निवडून आले. कुही तालुक्‍यात 14 सरपंच स्वतंत्र निवडून आले आहेत.
काटोल मतदार संघातील काटोल तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेस समर्थित 27 तर भाजप समर्थित 18 सरपंच निवडून आले आहेत. नरखेड तालुक्‍यात 25 सरपंच पदाचे उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेस समर्थित आहेत. पाच जागांवर भाजप समर्थित सरपंच विजयी झाले आहेत. कामठी तालुक्‍यात निवडून आलेल्या 11 पैकी 8 सरपंच कॉंग्रेस समर्थित आहेत. मौदा तालुक्‍यात भाजपचे 15, कॉंग्रेसचे 10 व शिवसनेचे 6 समर्थित सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. हिंगणा तालुक्‍यात 21 भाजप समर्थित तर 18 राष्ट्रवादी समर्थित सरपंच निवडून आले आहेत. नागपूर ग्रामीण तालुक्‍यातही राष्ट्रवादी कॉंग्रेस समर्थित उमेदवारांचा विजय झाल्याचा दावा केला जात आहे.
भाजपचे 112 सरपंच
सकाळच्या बातमीदारांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप समर्थित 112, कॉंग्रेस समर्थित 93, राष्ट्रवादी कॉंग्रेस समर्थित 74 तर शिवसेना समर्थित 24 सरपंच विजयी झाले आहेत. बसप, रिपब्लिकन पक्ष व अन्य स्वतंत्र सरपंच पदाचे उमेदवार 39 निवडून आले आहेत. कळमेश्‍वर तालुक्‍यात एका ठिकाणी निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात आला होता. जिल्ह्यात एकूण सहा सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत.

Web Title: Gram Panchayats election result news