ग्रामपंचायत सदस्याची हत्या, उपसरपंच ताब्यात

File photo
File photo

गोंदिया : तुमखेडा खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवारी (ता. 3) सकाळी उघडकीस आली. राजू विश्‍वनाथ टेंभूर्णीकर (वय 45) असे मृताचे नाव आहे.
राजकीय किंवा वैयक्तिक वादातून हे हत्याकांड घडल्याची चर्चा आहे. राजू टेंभूर्णीकर हे बुधवारी रात्री उशिरा गोंदिया येथून तुमखेडा येथे दुचाकीने येत होते. दरम्यान, फुलचूर ते तुमखेडाच्या मधोमध असलेल्या पांगोली नदी घाटाजवळ राजू रक्तबंबाळ अवस्थेत असल्याची माहिती काही जणांनी त्यांच्या मुलाला दिली. त्यामुळे मुलगा आपल्या मित्रांसह घटनास्थळी आला. वडील रक्तबंबाळ अवस्थेत असल्याचे पाहून त्यांना येथील केटीएस रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्‍टरांनी राजू यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात राजू यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, गोंदिया ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी सकाळपासून तपासचक्रे फिरविली. या प्रकरणी उपसरपंच दुर्गेश लिल्हारे (वय 36) व त्याचा भाऊ प्रकाश (वय 22, दोघेही रा. तुमखेडा खुर्द) यांना संशयाच्या आधारावर ताब्यात घेतले आहे. या घटनेत आणखी आरोपी सहभागी आहेत काय, याचा तपास ठाणेदार नारनवरे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com