हरभरा खरेदीचा आज शेवट; 19 हजारांवर शेतकरी प्रतीक्षेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

मुदतवाढीचा बुधवारी निर्णय
तूर आणि हरभरा खरेदीची मुदतवाढ करण्यासोबतच एकूणच शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत निर्णय घेण्यासाठी सहकारमंत्र्यांसोबत बुधवारी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत निर्णय अपेक्षित असल्याचे पाकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले.

अकोला : हमीभावाने हरभरा खरेदी प्रक्रिया मंगळवारी बंद होत आहे. जिल्ह्यात एकूण २४ हजार ९ शेतकऱ्यांनी नाफेडकडे आॅनलाइन नाेंदणी केली हाेती. त्यापैकी अातापर्यंत केवळ ४ हजार ५१६ शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात अाला. १९ हजार ४९४ शेतकरी प्रतीक्षेत अाहेत. त्यामुळे २९ मे राेजी संध्याकाळी ५ पर्यंत एेवढ्या शेतकऱ्यांकडे असलेल्या हरभऱ्याची कशी खरेदी हाेणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.  

जिल्ह्यात  महाराष्ट स्टेट काॅ-अाॅप. मार्केिटंग फेडरेशननेतर्फे अकाेला, तेल्हारा, पातूर, बार्शिटाकळी, वाडेगाव, पारस तर  विदर्भ काॅ-अाॅप. मार्केटिंग फेडरेशनने अकाेला व मूर्तिजापूर येथे हरभरा खरेदी प्रक्रिया राबवली. 

हरभऱ्याचे १७ काेटी थकले
हरभरा उत्पादक शेतकऱ्यांकडील अातापर्यंत ३० हजार ९५८ क्विंटल हरभऱ्यांचे १६ काेटी ८७ लाख २२ हजार ४०० रुपयांचे चुकारे नाफेडकडे थकले अाहेत. तुरीचे ५० काेटी ९२ लाख ३१ हजार ६६७ रुपयांचे चुकारे थकले अाहेत.   

मुदतवाढीचा बुधवारी निर्णय
तूर आणि हरभरा खरेदीची मुदतवाढ करण्यासोबतच एकूणच शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत निर्णय घेण्यासाठी सहकारमंत्र्यांसोबत बुधवारी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत निर्णय अपेक्षित असल्याचे पाकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले.

Web Title: gram purchase in Akola