मुदत संपल्यामुळे इथे होणार प्रशासकाची नियुक्ती

grampanchayat
grampanchayat

पांढरकवडा (जि. यवतमाळ) : कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर 26 ग्रामपंचायतींच्या निवडणुका अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या, अशा ग्रामपंचायतींची मुदत 30 एप्रिल रोजी समाप्त होणार असल्यामुळे या ठिकाणी लवकरच प्रशासकाची नियुक्ती करण्यात येईल.
केळापूर तालुक्‍यातील पाथरी, किन्ही, सखी (बु), सायखेडा, वृंदावन टाकळी, मोहदरी, अडणी, सोनुर्ली, सिंगलदीप, कारेगाव(रा), केळापूर, कोंघारा, घोन्सी, पिंपरी(रोड), चालबर्डी, सोनबर्डी, पहापळ, वांजरी, वाई, साखरा(खुर्द), कोदोरी, कवठा, चनाखा, साखरा(बु), ढोकी, रुढा या 26 ग्रामपंचायतींसाठी मार्च महिन्याच्या अखेरीस निवडणूक होणार होती. निवडणुकीसाठी दाखल अर्जांची छाननी सुरू असतानाच कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा राज्यात प्रादुर्भाव वाढायला सुरुवात झाली. कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने सदर ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना अनिश्‍चित काळासाठी स्थगिती दिली. तालुक्‍यातील 26 ग्रामपंचायतींची मुदत येत्या 30 एप्रिल रोजी समाप्त होत असल्यामुळे या ठिकाणी कार्यरत सरपंच, उपसरपंच यांना पायउतार व्हावे लागणार आहे. एप्रिल ते जून महिन्यापर्यंत कोणत्याही ग्रामपंचायतींच्या निवडणुका होण्याची सुतराम शक्‍यता नाही. त्यामुळे एप्रिल अखेरीस कार्यकाळ संपुष्टात येत असलेल्या ग्रामपंचायतींवर लवकरच प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. पांढरकवडा पंचायत समितीमधील विविध विभागांत सद्यस्थितीत पाच विस्तार अधिकारी कार्यरत असल्यामुळे एका विस्तार अधिकाऱ्याला जवळपास 5 ग्रामपंचायतींचा कारभार सांभाळावा लागणार आहे.

प्रशासकीय अधिकारी नेमणार
एप्रिल ते जूनदरम्यान मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकीय अधिकारी नेमण्यात यावा, असे आदेश शासन तसेच जिल्हा परिषद सीईओंकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार तालुक्‍यातील 26 ग्रामपंचायतींवर त्यांचा कार्यकाळ संपताच त्या दिवसापासून प्रशासक आपला कारभार सुरू करतील.
पी. एम. मडावी
गटविकास अधिकारी, पंचायत समिती, पांढरकवडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com